नवीन लेखन...

एक सीट का सवाल है बाबा

अस्मादिकांना एलर्जी, हृदयआणि मणक्याचे दुखण्याचा त्रास असल्या मुळे मेट्रोत तास भर उभे राहून प्रवास करणे त्रासदायक ठरते. म्हणतात न ‘जहाँ चाह, वहाँ राह’ बसायला सीट कशी मिळवावी या वर बरेच विचार मंथन केले. वय दिसाव मोठ दिसव म्हणून पांढऱ्या झालेल्या केसांना रंगविणे सोडून दिले. मेट्रोत चढल्या बरोबर, सीट वर बसलेल्या

लोकांचे निरीक्षण करतो. तरुण दिसत असलेल्या व्यक्ति जवळ उभे राहून विनम्र आवाजात ‘थोडी जगह मिलेगी क्या’ म्हणून विचारतो. तरुण व्यक्ती सभ्य असल्यात पांढऱ्या केसां कडे पाहून थोडीशी जागा बसायला देतो. एकदा ‘बुड’ टेकवायला जागा मिळाली की डोळे बंद करून ‘चीन प्रमाणे हळू हळू संपूर्ण सीट गिळंकृत करण्याच्या प्रयास सुरु करतो. शेवटी तो सभ्य व्यक्ति त्रासून जागा सोडून उठून जातो. बसायला संपूर्ण जागा मिळते.

पण अधिकांश यात्री सभ्य नसतात, ते बसल्याबरोबर डोळे बंद करून झोपेचे नाटक करतात. या वर ही उपाय शोधला. (सकाळी उत्तम नगर पर्यंतचा रिक्षा करून रूट क्र. ७४० मधून सचिवालय पर्यंतचा प्रवास बसून करतो. त्या स्टेंड जवळ एक भिकारी ‘एक रुपये का सवाल है बाबा’ म्हणत कित्येक वर्षांपासून भीक मागतो आहे, नेहमीचा असला तरी, त्याचा अत्यंत केविलवाणा चेहरा पाहून, त्याचा हातावर १-२ रुपये न कळत ठेवतोच.) आपल्याला सीट देऊ शकेल असा शिकार शोधून (३०च्या आतला) मनातल्या मनात त्या भिकाऱ्याचा चेहरा डोळ्यांसमोर आणतो, व त्याचाच सारखा अत्यंत केवीलवाणा दीनहीन चेहरा करत ‘शिकारच्या’ समोर उभा राहतो व एका हात तोंडावर ठेऊन खोकला येत नसला तरी लक्षवेधण्या साठी खोकलण्याचे नाटक सुरु करतो. सीट वर बसलेल्या व्यक्तीला डोळे उघडावेच लागतात, आपल्या समोर उभ्या आलेल्या व्यक्तीची प्रकृती ठीक दिसत नाही हे पाहून, बहुधा त्याचा हृदयात दयेचा पाझर फुटतोच आणि मला बसायला जागा मिळतेच.

पण समजा असे घडले नाही,
तरी ही खोकलण्यामुळे, खेटून उभ्या असलेल्यांना त्रास हा होतोच, त्यातला एखादा म्हणतोच ‘देखते नहीं अंकलजी को तकलीफ हो रही है’, बेचारा तो तरुण व्यक्ति मजबूरन आपली सीट सोडतो. सीट वर बसल्याक्षणी डोळे बंद करून झोपेचे नाटक सुरु करतो. उत्तम नगर आल्यावरच डोळे उघडतो.

पुष्कळदा मला वाटते माझ्यात आणि त्या भिकाऱ्यात काही ही फरक एवढाच तो पैश्याची भीक मागतो आणि मी सीटची.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..