नवीन लेखन...

एक भिजरी आठवण



पाऊस! पावसाच्या सरींसोबत कित्येक आठवणी सुध्दा भिजतात ना? जणु प्रत्येक पावसाबरोबर त्याच्या सरींसोबत प्रत्येक आठवणी ओल्या होतात.. त्या कधी हसर्‍या असतात तर कधी नुसत्याच ओल्या…लहानपणी मज्जा म्हणुन डबक्यात मारलेल्या उड्या.. अन मग पाठुन बसलेले आईचे धपाटे … आनि मोठेपणी जाणुन बुजुन व्हिनचिटर विसरुन मुदाम पाससात भिजणं

अगदि रोजचच.. मग आईसाहेबांच्या बोलण्या… कशाचीच मुभा न राखता मनसोक्त भिजत रहायचं…प्रत्येक थेंबाबरोबर नवी आठवण अन मग पावसाची नि त्या आठवणींची चढाओढ.. मग कळत्रच नाही की आपण त्या आठवणींमध्ये जास्त भिजतो का त्या पावसात? साराच खुळा खेळ पण हवाहवासा.. कधी ते आठवणींचे क्षण पावसाशिवाय भिजवतात..तर कधी पवसासकट…तो पाऊसही तसाच आठवतो. तो गार वारा.. वेगाने येणार्‍या सरी.. मातीचा सुगंध.. मग माझ मलाच विसरुन त्या पावसाच्या सरि झेलणं .. नुसतच भिजत राहण… तशी मी वेडीच आहे पावसाकरिता.. पावसाच येण म्हणजे माझ भान हरपुन पावसाचचं होण… सगळ जग विसरुन जाऊन मन बागडु लागत.. त्या वेळेस मनाच वयं विचारायच नसतं.. सगळ्या सिमा रेषा ओलांडुन ते पावसाशी एक्रुप होत.. गाणं गुणगुणनं.. गिरकी घेण.. सगळ माझ्याही नकळत होत उरतो तो फ़क्त पाऊस अन मी (?)… त्या दिवशिही तसच झाल.. मी एकटीच होते पावसासोबत… आजुबाजुला कुणीच नाही.. त्या मुळे माझा अन पावसाचा जणु मुक संवाद चालु झाला.. त्याची प्रत्येक सर झेलण्याचा माझा खुळा प्रयत्न सुरु होता.. मी अन तो गुणगुणतच होतो… हाताच तळ करुन पावसाला साठवत होते मी.. मध्येच एखादी गिरकी घेत होते… एकुणच सगळा वेडा प्रकार (जगाच्या द्रुष्टीने) सुरु होता.. मी हरवुन गेले होते पावसात तित्क्यात तो आला.. माझ्या नकळत.. कठड्याला टेकुन उभा रहिला.. माझ्या कडे बघतच… मला कळलच नव्हत त्याच येण.. मी मनसोक्त भिजत होते आणि तो फ़क्त माझ्याकडेच

बघत होता… एखाद्या कादबरीत किंवा पिक्च्र मद्ये घ
डाव तसा प्रसंग होता.. मी एक गिरकी घेता घेता माझ लक्ष त्याच्या कडे गेलं.. तो तसाच उभा होता माझ्याकडे टक लावुन… क्षणभर मला काही सुचलच नाही … आणी चक्क चक्क मी लाजले (?) माझ मलाच आश्चर्य वाटल की मी लाजु शकते?.. असो त्याला भानावर आणत आणी मुख्य म्हणजे मी स्वतः भानावर यायला क्षण दोन क्षण तरि गेलेच असतील… संभाषणाला सुरुवात करावी म्हणुन मी विचारल, ” येतोस भिजायला?” नंतर लगेचच दाताखाली जिभ गेली आणी स्वतःशीच पुटपुटले काय विचारल हे? तो नुसताच हसला.. मानेनेच नकार देत कोरदा चिट्ट तो म्हणाला अताच भिजलो… दोन मिनिटे मला कळलच नाही तो काय म्हणाला ते आणी जेव्हा समजल तेव्हा सुचलच नाही काय कराव ते… भिजलेली मी अन माझ मन पावसाच्या सरींमद्ये जास्त भिजलो का त्याच्या शब्दामद्ये कळलच नाही….

(हे सगळ काल्पनिक आहे)

— स्नेहा जैन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..