एका शाळेतलं मीडिया प्रशिक्षण

 
माझा मुलगा किंवा मुलगी आजच्या स्पर्धेच्या युगात कुठेही मागे पडू नयेत म्हणून पालकांचा होत असलेला आटापिटा कदाचित योग्य असेलही.. पण त्यालाही काही मर्यादा असाव्यात की नाही? मुलांच्या काळजीपोटी वा आपल्या इच्छा त्यांच्यावर लादण्यामध्ये मुलांची होणारी घुसमट त्या पालकांना त्यांच्या आईलाही जाणवत नसेल? का जिवघेण्या स्पर्धेत स्वत:चं आणि मुलांचं अस्तित्व, समाजातली प्रतिष्ठा या सार्‍यापायी मुलांचं हरवत चाललेलं लहानपण..त्यांची निरागसता..त्यांच्यावर कळत नकळत होणारे चुकीचे संस्कार.. त्यामुलांच्या विचारांची घडणं.. सार पालकांना हवं असत.. किंवा काळाची गरज म्हणून तेच या गोष्टी मुलांवर लादतात? हे आणि असे विचार तूम्ही खुप वाचले ऐकले पाहिले असतील… मीही फार जवळुन हे सगळ बघितलंआहे… खुपदा.. आधी एकदा एका इंटरनॅशनल शाळेत काम करत होते त्यावेळी पालकांची मुलाखत घेताना हे प्रकर्षानं जाणवलं होतं.. त्यावेळी त्या लहानग्यांची घुसमट बघवतही नव्हती… नंतर ती नोकरीच सोडली मी… पण परत एकदा नियतीने मला त्याच किंबहुना त्याच्यापेक्षा वाईट वळणावर पुन्हा आणून ठेवलं….परत एकदा एका मोठ्ठाल्या इंटरनॅशनल शाळेत नोकरी मिळाली.. तीही शिक्षिका म्हणून…विषय: मास communication and journalisum… इयत्ता तिसरी ते नववी…. मुळात तिसरीतल्या मुलांना मीडिया हा विषय का शिकवावा? समजा शिकवायचाच असेल तर मीडिया कसा पहावा.. का वापरावा वगैरे अगदी बेसिक .शिकवलं तर ठीक आहे पण ३री ते ९वीतल्या मुलांना पत्रकारिता.. किंवा चित्रपट निर्मिती? खरं तर माझ्या करिता हा धक्का होता… चित्रपट निर्मिती हा कलात्मक आणि सांस्कृतीक भाग आहे.. कदाचित योग्य पध्दतीनं मुलांच्या मनाला वळण दिलं तसे संस्कारघडविले तर योग्य ठरेल.(अर्थात त्या मुलांचा तसा कल असेल तर आणि तोही इतक्या लहानपणी ठरवणं अवघडच आहे.)पण त्या मुलांना शिकवण्याची पध्
दत पाहून मी हादरलेच… तास- पहिला वर्ग-३री या मुलांना अवघ्या ३० मिनिटांमध्ये ५ मिनिटांच्या चित्रपटासाठी विषय निवडायचा होता..? दुसर्‍या

तासाला त्या विषयावर गोष्ट लिहायची होती… कस शक्य आहे हे? ३रीतल्या मुलांना शब्दांपेक्षा चित्राची भाषा सोपी नाही का पडणार? आणि चित्रापेक्षा त्यांच्या गप्पांमधुन त्यांच भावविश्व जास्त रेखाटता येइल.. पण ती शाळा आहे.. त्यांचा तो सिलॅबस त्यांना वर्षाच्या आत पूर्ण करायाचा असतो… शिवाय त्यांना एक का एक्स्ट्रा एॅक्टिविटी आहे? महेश भुपतीचे टेनिस क्लासेस..शामक दावरचे डान्स क्लासेस.. स्केटींग.. योगा.. शिवाय अभ्यास… मग चित्रपट बनवण्यासाठी क्रिएटीव्हिटी कशाला लागते…चित्रपट कसा बनवायचा शिकवलं की झालं… बाकी त्यांचे टिचरस् आहेच… तो चित्रपट चांगला बनवायला.. तो अमेरिकेत होणार्‍या स्पर्धेसाठी पाठवण्या योग्य बनवण्याची जबाबदारी त्यांचीच असते की? दुसरा महत्वाचा विषय पत्रकारिता…..पत्रकारितेसारखा विषय समज आल्यावर शिकवायला हवा.. पण त्या कोवळ्या मुलांना चांगल काय आणि वाईट काय हेही समजत नाही.. त्यांना पत्रकारिता ही एक मोठी जबाबदारी असते याची जाणीवदेखील नाही..मात्र कॅमेरासमोर आत्मविश्वासाने बोलण्याची कला त्यांना या प्रशिक्षणातून मिळते आणि यालाच पत्रकारिता म्हणतात अशी शिकवणही… मोठा स्टुडिओ.. कॅमेरा सेटअप.. क्रोमा… एडिटींग… सगळं सगळं ह्या शाळेच्या छताखाली मुलांना शिकायला मिळत…. आणि हे प्रशिक्षण मिळवण्याची पात्रता एकच.. भरमसाठ फी भरण्याची ऐपत… हे दोन्ही विषय निवडताना कुठल्याही मुलांना जबरदस्ती करावीच लागात नाही.. कारण शाळेच्या परिसरातील केबल नेटवर्कवर या मुलांना
पले मित्र-मैत्रिणी <यंग जर्नोज्
हे सगळ पाहिलं आणि मन सुन्न झालं.. जेमतेम आठवडाभर नोकरी केली.. आणि मला नाही जमणार(नाही पाहवणार) म्हणून मी ती नोकरी सोडून दिली…. माझी होणारी ही घुसमट मी माझे पत्रकारितेतले गुरू नीतीन केळकर सर यांना बोलुन दाखवली तेव्हा त्यांनी मला एकच सांगितलं… आजकाल मीडिया हे शस्त्र शिकवताना एखाद्या मशीनप्रमाणे शिकवतात… हे मशिन कसं वापरायचं हे शिकवणचं त्यांचं उदिष्टय असतं.. कशासाठी वापरायचं हे जर शिकवलं तर ते त्यांना सोयीचं नसेल…

— स्नेहा जैनBe the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…