नवीन लेखन...

आला कोन, गेला कोन

जेव्हा कॅरमबोर्डावरच्या सोंगटीला आपण स्ट्रायकरचा वापर करून ढकलतो तेव्हा काय होतं हे बारकाईनं पाहिलं आहेत कधी? जर त्या बोर्डाच्या एका काठाशी काटकोन करून जर स्ट्रायकर मारला तर ती सोंगटी तशीच सरळ रेषेत पुढं जाते पलीकडच्या काठावर आपटते आणि तशीच आल्या पावली आलेल्या दिशेनंच परत फिरते.
पण तोच स्ट्रायकर

जर त्या काठाशी दुसराच कोन करून मारला तर त्या मारापायी पुढं जाणारी सोंगटीही पलीकडच्या काठावर आपटून परत फिरते. पण आता ती आलेल्या दिशेनं आपला परतीचा प्रवास करत नाही. ती दुसर्‍याच दिशेनं जाते. या किमयेचाच वापर करून अवघड ठिकाणी असलेल्या सोंगटीला भोकात ढकलणं आपल्याला सोपं जातं. प्रकाशकिरणांचा प्रवासही असाच होत असतो. जेव्हा हे किरण एखाद्या पदार्थावरून परावर्तित होतात तेव्हाही ते असेच त्या पदार्थावर आदळून आल्या बाजूलाच परत फिरतात. जेव्हा ते त्या पदार्थाच्या पृष्ठभागाशी काटकोनात असतात तेव्हा ते धोपटमार्ग स्वीकारत आल्या दिशेनंच परत फिरतात. न्हाव्याच्या सलूनमध्ये एकमेकांना समांतर असलेल्या आरशांमध्ये जी असंख्य प्रतिबिंबं दिसतात ती यामुळेच. कारण हे प्रकाशकिरण त्या दोन आरशांमध्ये येरझारा घातल्यासारखे उलटसुलट फिरत राहतात. पण तेच जर एखाद्या कोनातून आले तर मात्र परत फिरताना दुसर्‍याच कोनातून जातात. याचा अर्थ तो येणारा किरण आणि परत फिरणारा किरण एकमेकाशी फटकून वागतात असा मात्र नव्हे. ते दोन्हीही किरण काही विवक्षित नियम पाळतात.

त्या नियमाच्या चौकटीतच त्यांची दिशा ठरत असते. म्हणजे ज्या कोनातून किरण येतो त्याच कोनातून परत फिरणारा किरण पलीकडच्या बाजूला निघून जातो. शब्दांमध्ये हा नियम सांगता येईल. पण त्याचं चंत्र पाहिलं तर मग शब्दांची गरजच भासणार नाही.

— डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..