नवीन लेखन...

आधुनिक एक्स-रे आणि प्रतिमाशास्त्र

डॉक्टरांनी आपल्याला एक्स-रे, सी.टी. स्कॅन अशा चाचण्या करण्यास सांगितल्यावर आपण एक्स रे क्लिनिकमध्ये जातो खरे; पण या चाचण्या, त्यांची नावं याने पुरते गोंधळून जातो. या चाचण्या आता कॉमन झाल्या असल्या तरीही क्लिनिकमधल्या यंत्रांनी छाती दडपुन जाते. म्हणूनच याविषयीचे समज, गैरसमज, चाचण्यांची नेमकी पद्धत याविषयी मी या लेखमालेत चर्चा करणार आहे. क्ष किरणांचा शोध लागून आता १०० हून जास्त वर्ष लोटली आहेत. हे एक प्रतिमाशास्त्रच आहे. त्याचप्रमाणे अल्ट्रासाउंड लहरी, विद्युतचुंबकीय लहरी व किरणोत्सर्ग (आयसोटोप्स) इत्यादींचा उपयोग करुन रुग्णाच्या शरीरातील इंद्रियांची व त्यांच्या कार्याची सूक्ष्म व सखोल माहिती प्रतिमेच्या स्वरुपात मिळवणे या तत्वावर आधारलेल्या प्रतिमाशास्त्राचा आवाका खूप मोठा आहे.

या चाचण्या आणि त्याचा खर्च यामुळे आपण घाबरुन जातो किंवा खरचं या चाचण्या करण्याची गरज आहे का, असा संशय आपल्या मनात येतो. पण या चाचण्यांना येणारा खर्च हा चुकीच्या औषधामुळे धोका वाढल्यावर होणार्‍या खर्चापेक्षा कमीच असतो, हे लक्षात घ्यायला हवे. आता या चाचण्यांबद्दलचा संशय आणि भिती कमी झाली आहे पण गैरसमज मात्र कायम आहेत. म्हणून डॉक्टर ज्या तपासण्या करण्यास सांगतात त्याबाबत आपण नीट माहिती घेतली पाहिजे. उदा. कधीकधी चक्कर आल्यास साधा एक्स-रे न काढता महागडा वाटणारा एम.आर.आय. करणे जरुरीचे आहे कारण गंभीर आजार आहे की नाही हे त्यामुळे त्वरीत कळू शकते. डॉक्टरांनीही असे तपास सांगताना त्याबद्दल खात्री करुन घ्यावी आणि मगच अशी तपासणी करुन घेण्याचा सल्ला द्यावा, हे खरेच. या चाचण्यांसाठी वापरली जाणारी उपकरणे हळूहळू स्वस्त व्हावीत आणि पर्यायाने रुग्णावर त्याचा आर्थिक बोजा पडू नये, अशीही आशा आपण बाळगू या. या लेखमालेत मी एक्स-रे, स्पेशल एक्स-रे, सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन, कलर्ड डॉपलर, एम.आर.आय. आयसोटोप्स स्कॅन, पेट स्कॅन, मॅंमोग्राफी अशा तपासण्यांचा आढावा घेणार आहे. “हार्ट अॅटॅक रिस्क डिटेक्टर” सारख्या आपल्याकडे नव्याने आलेल्या यंत्रांबद्दलही माहिती देईन.

काही वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या “मेडिकल इमेजिंग” या मराठी पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला. या विषयावरील ते पहिलेच मराठी पुस्तक होते. मात्र छापील पुस्तकाच्या मर्यादांपासुन दुर होउन जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी या पुस्तकाला लेखमालेच्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इंटरनेटचा मोठा उपयोग होईल हे पटल्यामुळे ही लेखमाला सुरु करत आहे. “मराठीसृष्टी”सारख्या लोकप्रिय पोर्टलवरुन या लेखमालेतील लेख इंटरनेटशी जोडलेल्या हजारो मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यास उपयोग होणार आहे.

या लेखमालेच्या पहिल्याच लेखात छातीच्या साध्या एक्स-रे ची माहिती दिली आहे. यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

<A ref=”http://www.marathisrushti.com/?article=800″>http://www.marathisrushti.com/?article=800</A>

— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

डॉ. श्रीकांत राजे
About डॉ. श्रीकांत राजे 21 Articles
ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

1 Comment on आधुनिक एक्स-रे आणि प्रतिमाशास्त्र

  1. सर आपले एक्सरे वर मराठीतील पुस्तक हवे आहे मो 8605579801/9623879843

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..