नवीन लेखन...

अशीही एक भेट

१९९७ सालच्या जुन-जुलै चा काळ. आम्ही उभयता कैलास-मानसरोवरच्या यात्रेला गेलो होतो. एकूण ३० दिवसांची खडतर यात्रा झाली. परंतु जीवनामध्ये एक जबरदस्त आठवण निर्माण करुन राहिली. आपल्या धार्मिक द्दष्टीकोणातून ज्या अनेक यात्रांचे वर्णन केले गेले, त्यामधील सर्व श्रेष्ठ अशी ही समजली जाते. आजच्या अधुनिक युगांत देखील, ती यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणे म्हणजे एक भाग्यच वाटते. एक निसर्गरम्य साईटसीईंग ह्या दृष्टीकोणातून ती यात्रा खूपच महत्वाची वाटली. कैलास पर्वताच्या २२ हजार फूट उंचीवर आम्ही गेलो होतो. प्रथम कैलास व नंतर मानसरोवर परिक्रमा पूर्ण केली. प्रवासाला निघतांना इतर गरजेच्या वस्तूंमध्ये औषधांचे फार महत्व होते. कारण सर्व प्रवास डोंगर, दरय़ा नदी नाले पार करीत जाणारा, पायी अथवा घोड्यावर असा होता. रस्त्यावर दूर दूर अंतरावर गांव वस्ती तुरळक. चहा बिस्कीटे देखील मिळणे कठीण. तेथे औषधी ही कशी मिळणारआम्ही दोघेजण वैद्यकिय व्यवसायीक म्हणून बहूतेक औषधी व ईनजेक्शन्स घेतली होती.

प्रवासांत कळलेकी , त्या डोंगराळ भागांत मागास संस्कृतीचे लोक टोळ्या करुन राहतात. दरोडे, लुटालुट, खून हे नित्याचेच. आपल्याकडील चंबळ खोरय़ातल्या दरोडेखोराप्रमाणे. तरी देखील कित्येक वर्षांत कैलास मानसरोवरसाठी जाण्यारय़ा यात्रेकरुना त्रास दिला गेला नव्हता. आम्ही तसे भितीमय वातावरणांत असल्याचे जाणवत होतेच. सारेजण ‘ <ॐ नमः शिवाय

अचानक एक तुफान निर्माण करणारी घटना घडली. आमची दातखिळीच बसली. सात आठ दरोडेखोरांनी आम्हा यात्रीना गाठले. कांहीची तोंडे झाकलेली होती. त्यांच्या हातांत बंदुका व काठ्या होत्या. आम्ही सर्वजण एकदम थांबलो. आमच्या बरोबर चार टूरीस्ट गाईड्स दुभाषी होते. त्यानी आम्हास शांत राहून धीर धरण्यास सुचवले. दोघे गाईड्स त्या टोळीच्या म्होरक्याला सामोरे गेले. अभिवादन केले. मुखिया घोड्यावरुन उतरला. दुभाषीबरोबर त्यांचे बोलने झाले. दुभाषी आमच्याजवळ आला. त्याने विचारणा केली, ‘ तुमच्यापैकी कुणी डॉक्टर आहे कां प्रसंगाचे अवलोकन झाले नाही. आम्ही भित भितच पुढे गेलो. आम्ही आमचा वैद्यकीय क्षेत्राचा परिचय दिला. दुभाषीकडून कळले की त्यांच्या मुखियाचा मुलगा तापाने आजारी होता. व त्याला बैलगाडीत आणले होते. ते काळजीत होते. जवळ जवळ शंभर किलोमिटर अंतराच्या टापूत वैद्यकीय सोय उपलब्ध नव्हती. शक्तीशाली परंतु भयानक माणसे देखील केवळ परिस्थितीनुसार असाहाय्य झालेली जाणवली. एक यात्रींचा ग्रुप बघून कांही मदत मिळेल कां ह्या विचारांनी ते आले होते. सारे ऐकून घाम सुटला. येणारय़ा कोणत्या संकटाची ती चाहूल असेल, ह्याची भिती वाटू लागली.

मी पुढे गेलो. त्या मुखियाला अभिवादन केले. त्यानेपण मला नमस्कार केला. कांहीतरी सांगू लागला. मला कळले नाही. जवळच असलेल्या बैलगाडीत मुलगा झोपलेला होता. त्याला मी तपासले. न्युमोनिया होता. तापाने फणफणत होता. मी औषध दिले. एक इनजेक्शन पण दिले. दुभाषीतर्फे औषध घेण्याचे मार्गदर्शनही केले. मी पुन्हा अभिवादन करुन परत फिरलो. पण मुखियाने मला थांबण्याची खुण केली. मी चमकलो.

मुखिया त्याच्या घोड्याजवळ गेला. तेथे बांधलेल्या पिशवीतून एक मोठा खंजीर काढला. चांगले वेष्ठन, मुठ असलेला चमकदार. माझ्या जवळ येऊन तो खंजीर त्याने माझ्या हाती दिला. मी कांहीसा गोंधळलो.

दुभाषीने उलगडा केला. मुखियाने तो खंजीर मला भेट देऊ केला होता. मी संकोचलो. परंतु कांहीही न बोलता, हसत ती भेट मान्य केली. आभार मानले.

जाणीव झाली की माणसाच्या अन्तर्यामी चेतना म्हणून जे कांही असते, तेच ईश्वरी रुप असते. त्यांत सत्य प्रेम आनंद सदैव जागृत असते. त्याची शक्ती, त्याच वागणं, त्याचे विचार कितीही जहाल असले तरी खोलवर कोठेतरी प्रेमाचा झरा असतोच. कदाचित् प्रत्येक व्यक्तीचे अंकुरण हे आईच्याच उदरातून होते, जेथे केवळ प्रेमाचाच ओलावा असतो. वाढत जाणारय़ा, फोफावणाऱ्या वृक्षाच्या बाह्य वातावरणाने परिस्थितीजन्य संस्कार होऊन त्यात कठीणपणा अलेला असतो. तरीही प्रसंगानुसार त्याला त्याच्या प्रथमावस्थेतील प्रेम ओलावा, कारुण्याकडे झुकवतोच.

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..