बोधकथा

भौतिक सुखात मनुष्य असाच गुंगून जातो आणि मानसिक सुखाला पारखा होतो

भौतिक सुखात मनुष्य असाच गुंगून जातो आणि मानसिक सुखाला पारखा होतो

आपल्या शेतावरच्या घराच्या ओसरीत महादेव बसला होता. नुकताच त्याने समोरच्या झाडावर धरलेल्या मधमाशांच्या पोळ्यातून मध काढून आणला होता; आणि मधाचे भांडे ओसरीवरच समोर ठेवले होते. मधाच्या वासाने तेथे आसपास माशा घोंगावू लागल्या होत्या. हळूहळू मधाने भरलेल्या भांड्यावर त्या येऊन बसू लागल्या. भांड्याला बाहेरूनही मध लागला होता. त्या माश्या भांड्यावर बसून ... >>>

भाषासौंदर्य

दुपारी डबा खात असताना माझ्या डोळ्यांसमोर पहाटेचं चित्र आहे. स्टोव्हजवळ बसून माझी सिधू माझ्यासाठी डबा तयार करीत आहे. बाजूला सरिता निजली आहे. आदल्या दिवशीच्या भांडणामुळं नि सार्‍या रात्रीच्या जागरणामुळं तिचा चेहरा सुकला आहे; ह्या भांडणातच मी महिनाभर गावाला जातोय या विचारानं ती दुःखी झाली आहे. प्रत्येक घासामागं माझ्यासाठी कणाकणानं झिजणार्या ... >>>

वचनामृत

सूर्य ज्याप्रमाणे कमळाच्या सुगंधाला स्पर्श करीत नाही, वसंत ऋतु ज्याप्रमाणे वनांना समृद्ध करून निगून जातो किंवा गडगंज संपत्ती जवळ असली तरी महाविष्णू तिला किंमत देत नाही त्याप्रमाणे अलोलुपत्व असलेला मनुष्य सार्‍या सुखोपभोगांना तुच्छ मानतो.
— संत ज्ञानेश्वर

Jokes

सदाशिव पेठेतील कुलकर्ण्यांच्या पेट्रोल पंपावर :
  पुणेकर : ५ रू.चे पेट्रोल टाक रे..
  कर्मचारी(आश्चर्याने) : अरे बापरे…एवढे पेट्रोल टाकून कुठे दौरा आहे साहेबांचा ?
  पुणेकर : कुठे दौरा वगैरे नाही? मनात आलं कि असेच पैसे उधळतो मी.
  कर्मचारी जागेवर बेशुद्ध