J-036

एकदा दोन चोर चोरी करून पळताना एक पोलीस शिपाई त्यांना पाहतो आणि त्यांचा पाठलाग करतो. ते दोघे चोर आणखी जोरात पळू लागतात. शेवटी थकून ते एका भिंतीआड लपतात. थोड्याच वेळात तो शिपाई तेथे पोहोचतो. एका चोराची मानगूट पकडून म्हणतो, `अरे चोरा, पळून चाललास काय ? तुला माहीत आहे मी कोण आहे ते ?’तेव्हा तो हसून दुसऱया चोराला म्हणतो, “अरे, पाहिलसं का ? हे कोण आहेत ते त्यांना स्वतलाच माहीत नाही. ते आपल्याला विचारत आहेत.”