3468

आळशी माणूस शुभ दिवसाची वाट पहात बसतो.. आणि जो कष्ट करतो, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस शुभ असतो.. — गौतम बुद्ध

3194

मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा “माणूस’ होणे; हे त्याचे यश आहे. — सर्वपल्ली राधाकृष्णन

3191

माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. — आयझॅक न्यूटन

3189

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या बदलाचा भाग व्हा. — बराक ओबामा

3186

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. — कल्पना चावला

3183

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो. — बिल गेट्स

3180

पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल…. — डॉ. अब्दुल कलाम

3176

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. — धीरूभाई अंबानी

3174

जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या… रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.. — डॉ. बाबासाहेब आंबेडकर

3171

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. — नारायण मूर्ती

1 2 3 15