v-0010

सूर्य ज्याप्रमाणे कमळाच्या सुगंधाला स्पर्श करत नाही, वसंत ऋतू ज्याप्रमाणे वनांना समृद्ध करुन निघून जातो किंवा गडगंज संपत्ती जवळ असली तरी महाविष्णू तिला किंमत देत नाही. त्याप्रमाणे अलोलुपत्व अंगी बाणलेला मनुष्य सारे सुखोपभोग पायाशी लोळण घेत असतानाही त्यांना तुच्छ मानतो.

— संत ज्ञानेश्वर