सर्वस्वाचा त्याग

देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवावर उदार होऊन प्राणपणाने लढणाऱ्या देशभक्त क्रांतिकारकांची भूमिका ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने अशी असते. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध झालेल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्याच्या पुढे अन्य कशाचेही मोल नसते. तळहातावर शिर घेऊन प्राणपणाने झुंजणाऱ्या, दोन क्रांतिकारक भावांना जुलमी सत्तेने फाशीची शिक्षा सुनावली. प्रत्यक्ष फाशीच्या वेळेला दोघेही क्रांतिकारक बंधू निश्चल होते. त्यांनी माफीपत्र लिहून दिल्यास त्यांची शिक्षा सौम्य करण्यात येईल, पुढे कधीही उठाव न करण्याच्या बोलीवर सारी शिक्षाही माफ केली जाईल, असे प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. ते सारे त्यांनी झिडकारले. आणि ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही फासावर जात आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. ‘ असे त्यांनी गौरवाने सांगितले. धाकट्या भावाला अगोदर वधस्तंभाकडे नेण्यात आले. निघून त्याने पाहिले तर मोठ्या भावाच्या डोळ्यात असू दाटलेले त्याला दिसले. त्याचा निरोप घेत तो म्हणाला, ‘दादा वाईट .कशाचे वाटून घेतोस? अखेरची घडी आली म्हणून?’ त्यावर ताठ मानेने तो मोठा भाऊ म्हणाला, ‘अरे, नाही रे बंधुराजा डोळ्यात आलेले असू हे प्राण जाणार म्हणून आलेले नसून ते आनंदाश्रू आहेत. हीताम्य पत्करण्याची संधी तू धाकटा असूनह्री तुला प्रथम मिळते आहे, ह्याचा मला आनंद वाटला.

तात्पर्य : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना आपल्या प्राणाची आहुती देण्यातच धन्यता असते.