विवेकी निर्णय

आदर्श शाळा म्हणू मागल्या वर्ष शासनाचा मोठा पुरस्कारलाभलेली ती शाळा होती. आसपास त्या शाळेचे चांगले नाव होते. तेथील शिक्षक कष्टाळू आणि शिकविण्याची उस्कृष्ट हातोटी बाळगून होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल आदर आणि शाळेबद्दल अभिमान होता. एकदा मात्र शाळेतील एका वर्गात एका मुलाचे दप्तर चोरीला गेले. आजपर्यंत शाळेत असे कधीच घडले नव्हते. दुसऱ्या दिवशी सुद्धा कोणा मुलाचा पेन चोरीस गेला. कधी रबर तेर कधी पेन्सील चोरीला जाऊ लागली. अखेर वर्ग शिक्षकांनी वर्गातील दोन मुलांना लक्ष ठेवायला सांगितले. एक दिव्रस पी. टीच्या तासाला सर्व मुलं वर्गात दप्तर ठेवून मैदानावर गेली होती. ही दोन्ही मुलं वर्गात दबा धरून बसली. तेवढ्यात वर्गातील एक मुलगा वर्गात आला. कोणाच्या तरी दप्तरातून त्याने वस्तू काढून खिशात घातली आणि तो निघून गेला. दोन्ही मुलांनी त्याला पाहिलं आणि वर्गशिक्षकांना सर्व घटना सांगितली. वर्गशिक्षकांनी मुख्याध्यापकांशी चर्चा केली. परंतु मुख्याध्यापकांनी काहीही केलं नाही. चोरीचे प्रकार पुन्हा तीन-चार वेळा झाले. शेवटी विद्यार्थ्यांमधील धुसफूस वाढली, तेव्हा मुख्याध्यापक त्या वर्गावर आले आणि म्हणाले, ‘ मुलांनो, तुमच्या वर्गात चोरी कोण करतो है आम्हाला समजल आहे. चोर म्हणून त्याला शाळेतूनकाढले तर तो कोठेच शिक्षण घेऊ शकणार नाही. त्याचं आयुष्य बरबाद होईल तेव्हा त्याने माफी मागावी आणि पुन्हा चोरी करू नये. ” ही सरांची वाक्य ऐकून चोरी करणारा मुलगा रडायला लागला. त्याने सर्वांची माफी मागितली.

तात्पर्य : अधिकारी व्यक्तीला आतताईपणे विचार करून चालत नाही. त्यांना विवेक सांभाळूनच त्या लागतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.