जगात यशस्वीपणे वावरताना व्यवहार ज्ञानाच महत्त्वाचं ठरतं !

एक दिवस एक प्रसिद्ध उद्योगपती जॉगिंग ट*ॅकवर फिरायला आले होते. त्या ट*ॅकवर आसपास अनेक माणसं फिरायला आली होती. एक जण उद्योगपतींकडे पाहून म्हणाला, ”अरे हा एवढा मोठा उद्योगपती. साधे मॅटि*कची परीक्षासुद्धा पास झालेला नाही. मग त्याच्याजवळ कसली आलीय बुद्धिमत्ता !” हे ऐकल्यावर ते उद्योगपती त्या माणसाजवळ गेले आणि म्हणाले, ”तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. मला तुमचा नाव, पत्ता हवा आहे.” त्यांच हे वाक्य पूर्ण होताच त्याने खिशातून आपलं नाव, पत्त्याचं कार्ड ऐटीत काढून दिलं. पंधरा दिवसांनी त्या माणसाच्या घरी अब्रू नुकसानीची नोटीस उद्योगपतींनी पाठविली. पुढे खटला उभा राहिला. उद्योगपतीने अनेक विषयांच्या तज्ज्ञ लोकांना कोर्टात साक्षीसाठी बोलावले होते. उद्योगपतींनी प्रथम त्या सर्व तज्ज्ञ लोकांना प्रश्न विचारले. पण काही प्रश्नांची उत्तरं त्या तज्ज्ञ लोकांनाही देता आली नाहीत. त्यानंतर त्या सर्व बुद्धिवंतांनी उद्योगपतींना प्रश्न विचारले. त्यावेळेस संगणकाच्या मदतीने उद्योगपतींनी सर्व प्रश्नांची सहजपणे उत्तरे दिली. आणि न्यायाधीशांना विचारले, ”मिलॉर्ड, कोणती गोष्ट केव्हा, कशी आणि कुठे वापरायची याचे अचूक ज्ञान माझ्याजवळ आहे. त्या योगेच मी हे मोठमोठे कारखाने चालवतो आहे तेव्हा मी बुद्धिमान नाही हे म्हणणं योग्य आहे का ?” या त्यांच्या सफाईमुळे निकाल उद्योगपतींच्या बाजूने लागला.
तात्पर्य – जगात यशस्वीपणे वावरताना व्यवहार ज्ञानाच महत्त्वाचं ठरतं !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.