मोठी माणसं ही अंतर्बाह्य मोठीच असतात

लष्कराच्या गाड्या भरधाव वेगाने मिलीटरी कॅम्पवर निघाल्या होत्या. सगळ्यात मागे असलेली गाडीही वेगात जात होती. जरा रस्त्याच्या कडेला ती वळळी आणि बाजूला असलेल्या खड्ड्यात तिचे चाक अडकले. गाडी जागीच उभी राहिली. आतून शिपाई उतरले आणि गाडीचे चाक वर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्यांच्या वरचा अधिकारी बाजूला उभा राहून फक्त ”असं ढकला, वर उचला” असे फक्त हुकूम देत होता. त्याने गाडी काढायला हातभार लावला असता तर गाडीवर निघाली असती पण हुकूम करण्याची त्याची सवय, त्यामुळे त्याने तेवढेच केले. तितक्यात समोरून एक गाडी आली. त्या गाडीतून एक व्यक्ती उतरली. सैनिकांची अडचण पाहून त्या व्यक्तीने सैनिकांना मदत केली आणि गाडीचे चाक वर आले. मदतीला आलेल्या त्या व्यक्तीने हसून त्या अधिकार्‍याला सांगितले, ”पुन्हा कधी गरज वाटली तर मला फोन करून बोलवत जा. मी अवश्य येईन.” इतके बोलून त्याने खिशातून आपले व्हिजिटिग कार्ड काढले आणि त्या अधिकार्‍याच्या हातात दिले. अधिकार्‍याने ते कार्ड हातात घेऊन वाचले आणि त्याचा चेहरा भीतीने पांढरा फटफटीत पडला. कारण कार्डवर नाव होतं, अमेरिकेचे राष्ट*ाध्यक्ष जॉर्ज वॉशिग्टन यांचे !
तात्पर्य – मोठी माणसं ही अंतर्बाह्य मोठीच असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.