माणूस हा सवयीचा गुलाम आहे

आठवडी बाजारातून मासोळ्या विकून परत आपल्या गावी जायला काही कोळिणींना बराच उशीर झाला. एवढ्या अंधारात गावी कसं जाणार म्हणून रस्त्यालगत असलेल्या शेतमळ्यातील झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. त्यांना झोपडीबाहेर बसलेलं पाहून तेथील माळी म्हणाला, ‘‘आता खूप रात्र झाली आहे. इतक्या रात्रीच्या कुठे जाल ? तेव्हा माझ्या झोपडीत एवढी रात्र आरामात काढा आणि पहाट झाली की गावी जायला निघा.’’ त्या कोळिणींसमोर दुसरा काहीही पर्याय नव्हता. त्या सर्वजणी वृद्ध माळ्याच्या झोपडीत रात्रभर मुक्कामाला राहिल्या. पण त्यांच्यापैकी एकीलाही झोप येईना. बरीच रात्र त्यांनी या कुशीवरून त्या कुशीवर लोळत काढली. त्या खोलीच्या कोपर्यात मोगर्याच्या कळ्यांनी भरलेली एक मोठी पाटी होती. मोगर्याची फुलं रात्रीच उमलल्यामुळे मोगर्याच्या फुलांचा घमघमाट दरवळत होता. त्या फुलांचा सुगंध सहन न होऊन शेवटी त्यातील एका कोळिणीने आपली मासोळीची टोपली आणली आणि त्या टोपलीवर डोकं ठेवताच तिला शांत झोप लागली.
तात्पर्य – माणूस हा सवयीचा गुलाम आहे.

November 2016 rubrik service hinterlasse einen kommentar vorlesen in deutschland existiert Klicken Sie hier fur info ein föderales bildungssystem

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.