भा. द. खेर (चाणक्य)

सुराज्यनिर्मितीसाठी चाणक्याला अशाच धूर्त, बुद्धिमान मुत्सद्याची गरज होती. परंतु राजाच्या पुरता कच्छपी लागलेला हा निष्णात मुत्सद्दी आपल्या बाजूकडे प्रथम काय वळवून घेता येईल, या गोष्टीचा चाणक्याला विचार पडला होता. तो आपल्या चालीनं कितपत चालेल, याविषयी चाणक्याच्या मनात शंका होती. शेषानं आपल्या मस्तकावर धरित्रीचा भार तोलून धरावा, त्याप्रमाणेच अमात्य राक्षसानं मगधाच्या मोठ्या राज्याचा भार आपल्या मस्तकी धारण केला होता. फरक एवढाच की, शषाच्या मस्तकावरील पृथ्वीवर पापाबरोबर पुण्यही होतं. मगधात मात्र पुण्याचा पुरता अभाव होता…परंतु सध्या तरी चाणक्यानं अमात्य राक्षसाच्या कृतीचं फक्त बारकाईनं निरीक्षण करायचं ठरवलं. अमात्य राक्षसही चाणक्याच्या बुद्धिकौशल्याचं तसंच बारकाईनं निरीक्षण करत होता. दोन बुद्धिमान धूर्त पुरुष परस्परांच्या निरीक्षणात पुरते गुंतले होते.

– भा. द. खेर (चाणक्य)