ठकाशी व्हावे महाठक

एकदा एक शिकारी शिकार करण्यासाठी जंगलात जाळे लावतो. त्या जाळ्यात एक वाघ अडकतो. जाळ्यातून सुटण्यासाठी तो खूप धडपड करत असतो. तेवढ्यात एक लाकूडतोड्या तेथून जाताना वाघाला दिसतो. वाघ त्याला पाहून वाचवा, वाचवा म्हणून ओरडतो. पण हुशार लाकूडतोड्या म्हणतो ‘‘मी तुला वाचवले तर तूच मला खाऊन टाकशील.’’ पण वाघाने खूप विनवण्या केल्यावर लाकूडतोड्या त्याला सोडवतो. जाळ्याबाहेर आल्याबरोबर ‘‘आता मी तुला खाणार’’ म्हणत वाघोबा डरकाळी फोडतो; पण लाकूडतोड्या तीन प्रश्न विचारण्यापुरते जीवदान वाघोबाला मागतो. मग लाकूडतोड्या म्हशीला विचारतो, ‘‘वाघाचा हा हट्ट बरोबर आहे का ?’’ यावर म्हैस म्हणते, ‘‘जगच असं आहे. माझं दूध संपलं की लोक मला शेतीला जुंपतात.’’ मग लाकूडतोड्या हाच प्रश्न झाडाला विचारतो. झाड उत्तर देते, ‘‘मी लोकांना सावली देतो पण तरीही लोक माझ्या फांद्या तोडतात.’’ शेवटी कंटाळून लाकूडतोड्याने लांडग्याला आपली कहाणी सांगितली. कहाणी समजलीच नाही म्हणत जाळ्याजवळ जाऊन समजावून सांग असे लांडगा सांगतो. जाळ्याजवळ गेल्यावर नक्की काय घडले ते लांडग्याला समजत नाही. त्यावेळी वाघ जाळ्यात जाऊन दाखवतो व मी असा अडकलो होतो हे लांडग्यास सांगतो. त्याक्षणी लांडगा जाळ्याची गाठ मारून वाघोबाला जाळ्यात अडकवतो. लाकूडतोड्याची सुटका करतो.
तात्पर्य – ठकाशी व्हावे महाठक.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.