ज्ञानाची दृष्टी नसेल तर यश कसं मिळेल

एका लहानशा गावातून एक खेडूत माणूस शहरात आला होता. वयोमानामुळे त्याची दृष्टी अतिशय कमजोर झाली होती. त्याला कोणीतरी सल्ला दिला, ”दृष्टी कमजोर झाली आहे तर तुम्ही चष्मा का लावत नाही ? समोरच्या दुकानातच वाचायला येणारे चष्मे मिळतात.” तेव्हा तो खेडूत त्या दुकानात गेला. दुकानदाराने त्यांच्या डोळ्यांचा नंबर तपासण्यासाठी वेगवेगळ्या नंबरचे चष्मे त्यांना लावून पाहण्यास सांगितले. आणि समोर एक अक्षरांचा चार्टही दिला. प्रत्येक चष्मा लावताना ”ह्या चष्म्याने वाचता येतं का ?” असे तो दुकानदार विचारत असे. प्रत्येकवेळी ते वृद्ध गृहस्थ ‘नाही’ म्हणून मान हलवत. शेवटी दुकानदाराच्या लक्षात आले की या माणसाला बहुतेक लिहिता-वाचता येत नाही. मनातील शंका त्याने विचारली की, ”तुम्हाला लिहिता वाचता येतं का ?” त्यावर ते गृहस्थ म्हणाले, ”नाही हो, तुमच्या दुकानातील चष्मा लावल्यावर वाचता येतं असे कुणीतरी सांगितले म्हणून तो चष्मा घ्यायला मी इथे आलो.”
तात्पर्य – ज्ञानाची दृष्टी नसेल तर यश कसं मिळेल?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.