काही निर्णय झटपटच घ्यायचे असतात

सेनगुप्त राजाने आपल्या हयातीत आपले राज्य खूप वाढविले होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र दासगुप्त गादीवर आला. अनेक वेळा दासगुप्ताने पाहिले होते की राज्यात एखादी समस्या उद्भवली तर त्याचे वडील राजा सेनगुप्त राज्यातील अनेकांशी सल्लामसलत करून मग त्या समस्येवर तोडगा काढायचे. राज्यावर शत्रू हल्ला करणार आहे अशी बातमी गुप्तचरांनी आणली. राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यावर उपाय योजावा म्हणून दासगुप्ताने राज्यातील प्रत्येक समाज प्रमुखास दरबारात बोलाविले व प्रत्येकाला सल्ला विचारू लागला. प्रथम सुताराला विचारले. सुतार म्हणाला, ”राज्याचे रक्षण करण्यासाठी सीमेवर लाकडी भित बांधू !” चर्मकार म्हणाले, ”चामड्याची भित जास्त चिवट होईल.” त्यावर लोहार म्हणाला, ”मला तरी वाटतं की लोखंडाचीच भित बांधावी त्या इतकी मजबूत भित दुसरी कोणतीच असणार नाही.” तेथे बसलेल्या वकिलांना हे काही सहन होईना. ते पटकन म्हणाले, ”एवढं सगळं करण्यापेक्षा युत्रि*वाद करून आपण शत्रूपक्षाला पटवून देऊ की दुसर्‍याचं राज्य लुबाडणं किती अन्यायकारक आहे ते !” त्यानंतर सोनार, धर्मपंडित, व्यापारी यांचे युत्रि*वाद बराच काळ राजाला सांगणं सुरू होतं. त्यात निर्णय घ्यायला इतका वेळ गेला की शत्रू राजवाड्याच्या दाराशी येऊन पोहोचला.
तात्पर्य – काही निर्णय झटपटच घ्यायचे असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.