काम एकच असतं पण त्या मागची प्रेरणा आणि भाव हा ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे आणि आकलनाप्रमाणे असतो

एका गावात एका मंदिराचे बांधकाम सुरू होते. तेथे काम करणारे अनेक मजूर होते. त्यापैकी एका मजूराला विचारले की, ”बाबा रे, तू काम का करतोस ?”
त्यावर तो म्हणाला, ”पोट जाळण्यासाठी काम करावे लागते ?” दुसर्‍या मजूराला तोच प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, ”बायका, मुले, संसार यासाठी काम करावे लागते.” तिसर्‍या मजूराला विचारले असता तो म्हणाला की, ”ज्या परमेश्वराने सारी सृष्टी घडवली, मला घडवले त्या परमेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी मी काम करतो !”
तिघेही मजुरीच छकरीत असत; पण प्रत्येकाचा काम करण्यामागचा भाव मात्र वेगळा होता.
तात्पर्य – काम एकच असतं पण त्या मागची प्रेरणा आणि भाव हा ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे आणि आकलनाप्रमाणे असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.