एकीच्या बळानेच संकटं टाळता येतात

खरं तर एकमेकांचे नेहमी शत्रू असलेले पण एका शिकार्याच्या भीतीने मित्र बनलेले चार प्राणी एका जंगलात रहात हते. कासव, उंदीर, गवा आणि कावळा हे चारही मित्र जंगलातून नेहमी एकत्र फिरत असत. एकमेकांच्या साथीने फिरताना त्यांनी अनेक संकटांवर मात केली होती. एकदा असंच चौघेजण पोट भरण्यासाठी हिडत असताना कासव शिकार्याच्या जाळ्यात सापडले. त्याला सोडवण्यासाठी बाकीच्या तिघांनी युक्ती लढविली. गवा शिकार्यापासून थोड्या अंतरावर जाऊन मेल्याचे सोंग घेऊन निपचित पडला. कावळा काव काव करत त्याच्या भोवताली घिरट्या घालू लागला. शिकार्याने ते पाहिले. त्याच्या मनात विचार आला, इथे तर आयती शिकार मिळाली. कासवाला जाळ्यातच सोडून शिकारी गव्याकडे धावला. तेवढ्यात उंदीर कासवाच्या जाळ्यापर्यंत गेला. त्याने जाळे कुरतडून कासवाची सुटका केली. कासव सुटलेले पाहताच कावळा जोराने ओरडू लागला. तोपर्यंत शिकारी गव्यापर्यंत येऊन पोहोचला नव्हता. कावळ्याचं सांकेतिक ओरडणं ऐकून सोंग घेऊन पडलेला गवा उठून जंगलात निघून गेला. ते पाहून शिकारी जाळ्यात अडकलेल्या कासवाच्या जवळ येतो. पाहतो तो तिथे रिकामे कुरतडलेले जाळे फक्त असते. कासवही कधीच पळून गेलेले असते. ::
तात्पर्य – एकीच्या बळानेच संकटं टाळता येतात.

2 Comments on एकीच्या बळानेच संकटं टाळता येतात

Leave a Reply

Your email address will not be published.