आधी स्वत:च्या अंतरात्म्याला जाणून घ्यायची इच्छा हवी

सत्याचा शोध घेण्यासाठी विवेकानंदांचे भारतभर भ्रमण सुरू होते. एकदा रात्री ते नदीकाठा पलीकडच्या देवेंद्र महर्षींच्या आश्रमात गेले. ध्यानात बसलेल्या महर्षींना त्यांनी विचारले, ”ह्या जगात ईश्वर आहे का नाही हे मला जाणून घ्यायचे आहे.” अर्ध्या रात्री येऊन असा प्रश्न विचारणारा युवक पाहून महर्षींना चमत्कारिक वाटले. ते म्हणाले, ”आजची रात्र तू इथे झोप घे, सकाळी निवांतपणे आपण यावर बोलू.” हे वाक्य ऐकल्यावर विवेकानंद म्हणाले, ”आपण मला याचे उत्तर देऊ शकणार नाही.” असं म्हणत विवेकानंद तेथून बाहेर पडले. दोन महिन्यानंतर हाच प्रश्न त्यांनी रामकृष्ण परमहंसांना विचारला. त्यावर परमहंस म्हणाले, ”देव आहे का नाही ह्याची चिता तू कशाला करतोस ? अजून तू त्याला ओळखंल सुद्धा नाहीस तेव्हा आधी तू त्याला जाणून घे आणि मगच तो आहे का नाही याचा विचार कर.” हे ऐकून विवेकानंद विचारात पडले की, ”आतापर्यंत मी लोकांना शब्दात पकडत होतो पण अजूनही परमेश्वराच्या अस्तित्वाची आणि माझी ओळख तरी कोठे झाली आहे ?” रामकृष्णांजवळ फक्त शब्द नव्हते तर अनुभव होता. अनुभवाजवळ टाळाटाळ कधीच नसते, कारण अनुभवाने ज्ञान हे नेहमी आतून येत असते हे विवेकानंदांना समजून चुकले.
तात्पर्य – आधी स्वत:च्या अंतरात्म्याला जाणून घ्यायची इच्छा हवी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.