लेखसंग्रह व्यक्तीसंदर्भ

टिळक, चन्द्रशेखर मोरेश्वर
Print This Article

Tilak, Chandrashekhar Moreshwar

 

चन्द्रशेखर मोरेश्वर टिळक हे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. गेली १३ वर्षे ते 'एनएसडीएल'मध्ये कार्यरत आहेत, त्याशिवाय त्यांनी मुंबई शेअर बाजारात ८ वर्षे, सेबीमध्ये २ वर्षे आणि इंडसेकमध्ये २ वर्षे अशी गुंतवणूक क्षेत्रांशी संबंधीत नोकरी केली आहे. १ एप्रिल १९९२ साली त्यांची सेबीवर प्रतिनियुक्ती झाली. भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधुन प्रतिनियुक्तीवर जाणारे सर्वात तरूण आणि पहिले महाराष्ट्रीय अधिकारी आहे. अनेक अर्थिक घोटाळ्यांची त्यांनी तपासणी अधिकारी म्हणून तपासणी केली आहे.

जागतिक मंदी या विषयावर त्यांनी ७ महिन्यात ९० भाषणे केली होती. आणि त्यांचे एकुण ९ अंदाज बरोबर ठरले होते.

गेली २४ वर्षें टिळक सातत्याने अर्थसंकल्पीय विश्लेषणाचे कार्यक्रम करतात. आजपर्यंत त्यांचे विविध विषयांवरचे १५००हून जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्रासह इतरत्र त्यांची १६०० व्याख्याने  झाली आहेत, तसेच अनेक संस्थांमध्ये ते मानद व्याख्याता आहेत.

 त्यांची विविध विषयांवर व्याख्याने  झाली आहेत उदा. जागतिक मंदी आणि सामाजिक भारत, जागतिक मंदी आणि आपण, जागतिक मंदी आणि आपली गुंतवणूक, अर्थसंकल्पीय विष्लेषण, अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक, भारतीय भांडवल बाजार: २०१० आणि नंतर, आर्थिक घोटाळे आणि आम्ही, गुंतवणुकीचे समाजशास्त्र, गुंतवणूकीचे मानसशास्त्र, गुंतवणुकीतील धोक्यांचे नियोजन, स्वेच्छानिवृत्तीचे आव्हान, बदलते अर्थकारण - बदलते समाजकारण, जे.आर.डी. टाटा : शतकोत्तर विचार, आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक, 'वंदे मातरम्'चा कालखंड, आजच्या संदर्भात वंदे मातरम् , आजचे अध्यात्म, चला नवा भारत घडवूया, राष्ट्रनिर्मितीचे आव्हान, राष्ट्रवादाची बदलती संकल्पना, अल्केमिस्ट टू सी गल, व्हाया यू कॉन विन
टिळक यांची गुंतवणूक गुरू, अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थ व्यवस्था, the Budgetary Measures 1985-2000 आणि गुंतवणूक पंचातन ही चार पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.  त्यातल्या गुंतवणूक पंचातन ह्या राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची आठवी आवृत्ती सुरू आहे. शिवाय त्यांच्या व्याख्यानांच्या ५ सीडी.चेही प्रकाशन झाले आहे.

चन्द्रशेखर टिळक यांना सिकॉम- आनंद भडकमकर अॅवॉर्ड, जायंटस् अॅवॉर्ड, कैलासभाई मेहता पुरस्कार, युनायटेड वेस्टर्न बँक पुरस्कार, नॅशनल सेव्हिंग्ज ऑर्गनायझेशन पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे
 
या व्यक्तीसंदर्भाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://www.marathisrushti.com/?profile=10431


 आपल्याला अधिक माहिती पाठवायची आहे?
व्यक्तिसंदर्भ माहिती
आपले नाव:- इ-मेल:-
माहिती:-
अटॅचमेंट
Write the following word:

Not readable? Change text.
 
मराठी व्यक्ती संदर्भकोश....
  • मराठी सिनेसृष्टीतले गेल्या शंभर वर्षांतील १०० सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट.
    आणि हे चित्रपटही ऑनलाईन पहाणार आहोत फक्त मराठीसृष्टी.कॉम वर
  • स्वप्निल जोशी आणि गिरिजा ओक यांचा उत्तम अभिनय असलेला मानिनी हा चित्रपट २००४ साली रुपेरी पडद्यावर झळकला. या चित्रपटाची निर्मिती व .....
  • Box-Articles-4
  • मराठी सिनेसृष्टीतली गेल्या शंभर वर्षांतील सर्वोत्कृष्ट मराठी गाणी.
    आणि ही गाणी ऑनलाईन पहाणार आहोत फक्त मराठीसृष्टी.कॉम वर
  • संत तुकारामांचाच अभंग वाटावा, इतके अस्सल उतरलेले ' आधी बीज एकले ' हे गीत शांताराम आठवले यांनी ७० वर्षांपूर्वी शब्दबद्ध केले . .....
  • Box-Articles-5
मराठीसृष्टी ताजे लेखन

Loading Content.Please Wait...