ब्राऊनी

टॉफी बनाना ब्राऊनी
साहित्य : १०० ग्रॅम मिल्क मेड, १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम चॉकलेट, ३ अंडी, २०० ग्रॅम मैदा, २ ते ३ कुस्क रलेली केळी
कृती:- एका काचेच्या बाऊलमध्ये बटर चॉकलेट मायक्रो मीडियमवर ४ ते ५ मिनिटे ठेवून मेल्ट करून घ्यावे व नीट मिक्स करून बाजूला करून ठेवावे.
एका भांडय़ात अंडी, साखर फेटून घ्यावे. त्यात बटर चॉकलेटचे मिश्रण मिक्स करावे व मैदा टाकून हळूवार मिक्स करून घ्यावे. एका काचेच्या बाऊलमध्ये मिल्कमेड व कुस्करलेले बनाना मायक्रो हायवर २ ते ३ मिनिटे ठेवावे. एका पसरट मायक्रोच्या भांडय़ात मिल्कमेड व बनानाचे मिश्रण नीट पसरून घ्यावे त्यावर तयार झालेले ब्राऊनीचे मिश्रण टाकावे. कन्व्हेक्शन मायक्रोमध्ये मीडियम २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावे. ब्राऊनी थोडीशी गरम असताना मोल्डमधून काढून घ्यावी. पिसेस करून गरम सव्‍‌र्ह करू शकता किंवा कुठल्याही आईस्क्रीम बरोबर सव्‍‌र्ह करू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

चॉकलेट क्रम्बल ब्राऊनी
साहित्य : १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, ३ अंडी, २०० ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम डार्क चॉकलेट,क्रमबलसाठी,१०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम मैदा, ५० ग्रॅम काजूचे तुकडे, ५० ग्रॅम ओटस्.
कृती:- एका काचेच्या भांडय़ात बटर थोडेसे मेल्ट करून घ्यावे. त्यात साखर, मैदा, काजूचे तुकडे व ओटस् टाकून ब्रेड क्रम कन्सीसटन्सी होईपर्यंत मिक्स करावे. एका काचेच्या बाऊलमध्ये बटर, डार्क चॉकलेट मीडियमवर ४ ते ५ मिनिटे ठेवून मेल्ट करून घ्यावे व नीट मिक्स करून बाजूला करून ठेवावे. एका भांडय़ात अंडी, साखर फेटून घ्यावे. त्यात बटर चॉकलेटचे मिश्रण मिक्स करावे व मैदा टाकून हळूवार मिक्स करून घ्यावे. एका पसरट भांडय़ात मिश्रण नीट पसरून घ्यावे. त्यावर तयार झालेले क्रम्बलचे मिश्रण टाकावे. कन्व्हेक्शन मायक्रोमध्ये मीडियम २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावे. साधारणत: ब्राऊनी आइस्क्रीम सव्‍‌र्ह करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बेरी ब्राऊनी
साहित्य : १ वाटी मऊ बेरी, १ वाटी कणीक, पाव वाटी तूप किंवा बटर, २ चमचे बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, अर्धी वाटी कोको पावडर, १ वाटी पिठीसाखर, १ चमचा चॉकलेट किंवा व्हॅनिला इसेन्स, आवडत असल्यास २-३ चमचे अक्रोडचे तुकडे, पाऊण वाटी दूध.
कृती : बेरी मिक्सरवर बारीक करून घ्यावी. कणीक, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि पिठीसाखर तीनदा चाळून घ्यावी. वरचं उरलेलं मिश्रणही त्यातच टाकावं. चाळण्यामुळे केकला हलकेपणा येतो. तूप फेटून घ्यावं. त्यात बेरी घालून फेटावं. त्यात पिठाचं मिश्रण, सोडा, दूध आणि इसेन्स घालून मिश्रण फेटावं. मिश्रण सहज पडण्याइतपत पातळ असावं. आवडत असल्यास मिश्रणात अक्रोडचे तुकडे घालावेत. मिश्रण केकच्या तयार पॅनमधे घालून 18क् अंशावर 2क् ते 22 मिनिटं बेक करावं. पॅन ओव्हनम्ध्ये ठेवण्याआधीच दहा मिनिट चालू केलेला असावा. केक लावण्याआधी पॅन तयार करावा लागतो. त्यासाठी आधी अॅल्युमिनिअमच्या पॅनला बटर/तुपाचा हलका हात लावून घ्यावा. त्यावर कणिक भुरभुरून सगळ्या पॅनवर पसरवून घ्या. केक झाल्यावर पॅन पालथा घालून ठेवावा. यामुळे केक लवकर सुटून येतो. तळाशी पॅनच्या आकाराचा बटरपेपरही लावता येतो.
केक करताना ओव्हन नसला तरी काही बिघडत नाही. साध्या गॅसवरही मस्त केक बनवता येतो. त्यासाठी साधारण १ कि.ग्रॅ. स्वच्छ वाळू किंवा मीठ लागेल. केकची तयारी सुरू केली की मिश्रण पॅनमधे ओतून पॅन या कढईत किंवा कुकरमधे असलेल्या वाळू किंवा मिठात ठेवावा. वाळू/मीठ पॅनच्या पाऊण उंचीर्पयत यायला हवं. मिश्रण पॅनमध्ये ओतल्यावर आधी गॅस साधारण दहा मिनिटांर्पयत मोठा असावा. नंतर दोन-तीन मिनिटं मध्यम गॅस ठेवावा. नंतर बारीक गॅसवर केक बेक होऊ द्यावा. पॅनवर उंच डोमसारखं झाकण असावं. बारीक गॅसवर १०-१२ मिनिटं ठेवल्यावर केकमधे सुरी किंवा विणकामाची सुई घालून बघावं. सुई कोरडी आली की केक झाला असं समजावं. बाहेर काढून स्लाईस करून द्यावेत. ही बेरी ब्राऊनी आदल्या दिवशीही बनवून ठेवता येते
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*