पालक पनीर पॅटिस

साहित्य :- एक जुडी पालक, एक वाटी पनीर, बारीक चिरलेला एक वाटी कांदा, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे धने-जिरेपूड, मीठ, साखर, चवीनुसार लिंबूरस, डाळीचे पीठ.

कृती :- पालक धुऊन गरम पाण्यात घाला. 2-3 मिनिटांनी बाहेर काढून बारीक चिरा. तेल गरम करून त्यात मिरची पेस्ट आणि कांदा घाला. वाफ आल्यावर पालक घालून परता. पनीर कुस्करून पालकामध्ये मिसळा व हलवा. नंतर धने-जिरे पूड, लिंबूरस, मीठ, साखर घाला. मिश्रण एकजीव करा व गॅस बंद करा. उकडलेले बटाटे, मीठ, डाळीचे पीठ एकत्र करून मळून गोळा तयार करा. त्याची पारी तयार करून पालक व पनीरचे मिश्रण त्यात भरा. पारीचे तोंड बंद करून ती चपटी करा व तेलात तांबूस रंगावर तळा. सॉसबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

 

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*