विक्रम सावरकर

Vikram Savarkar

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे व त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र असलेल्या विक्रम सावरकर यांनी जाज्वल्य देशभक्तीचे व्रत स्वीकारत हिंदुमहासभेसाठी कार्य केले.हिंदू संघटन कार्यामुळे त्यांचा विशेष प्रभाव हिंदू महासभेच्या कार्यावर नेहमीच राहिला आहे.

हिंदु महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी देशभर अखंड हिंदुस्तान, समान नागरी कायदा साठी कार्य केले.मुंबई महानगर पालिकेत वंदे मातरम हे देशभक्ती गीत म्हणावे यासाठी मोर्चा काढला होता. तसेच यासंबंधी विधानसभेत चर्चा घडवून आणली होती. याच कारणासाठी त्यावेळी विधानसभेने हिंदुमहासभेच्या कार्यकर्त्यांना शिक्षा देखील सुनावली होती.

भिवंडी येथे शिवजयंती मिरणवुक निघावी, मलंग गडावरील बंदी दुर व्हावी यासाठी विक्रम सावरकरांनी यशस्वी आंदोलन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून विक्रम सावरकर यांनी मुरबाड, जिल्हा-ठाणे येथे ”महाराष्ट्र सैनिकी विद्यालय” सुरू केले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते संस्थापक सदस्य होते.हिंदुत्वासाठी राजकीय कृतीशील कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली होती. आयुष्याच्या अखेरच्या काळात प्रकृती अस्वस्थ असली तरी ते सावरकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी पोटतिडकीने कार्यरत राहिले.

२३ फेब्रुवारी २०१४ या दिवशी वृद्धापकाळाने म्हणजेच वयाच्या ८२ व्या वर्षी विक्रम सावरकरांचे निधन झाले.

( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*