बोधनकर, विजयराज मुरलीधर

एक व्यावसायिक चित्रकार, लेखक व वक्ता अशी विजयराज मुरलीधर बोधनकार ह्यांची ओळख करुन देता येईल. जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतल्यावर लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ ह्या वृत्तपत्रांमधून लेखन व चित्रकारीता केली. त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे.

मुंबईत १९८३

ला अवघ्या २०० रुपयांत आणि कोणापुढेही हात न पसरता स्वबळावर शिक्षण घेऊन संघर्ष करीत या क्षेत्रात स्वत:चा ठसा त्यांनी उमटवला. लेखन चित्रकीर्तन, चित्रकला प्रसारासाठी ते व्याख्याने देतात. तसेच साहित्यिकांच्या अर्क चित्रांचे भव्य प्रदर्शनही भरवले. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. देश परदेशात अध्यात्मिक चित्रांचे संग्रह, दिवाळी अंकामधून लेखन, विविध विषयांवरचे व्याख्यान आणि शाळा कॉलेजांमधून तरुणांसमोर कार्यक्रम करुन ते आपल्यातील अंगभूत कला आणि विचार लोकांसमोर मांडले.

ठाणे येथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांनी आतापर्यंतच्या सर्व संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन भरविले होते.

ठाण्यात चित्रकला प्रसारासाठी विविध प्रकल्प राबविले. साहित्य प्रसारासाठी त्यांनी ९ चित्रांचे प्रदर्शन भरविले. ब्रम्हांड संकुलात मोफत वाचनालयही ते चालवतात. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज ह्यांवर शाळेत प्रदर्शनं भरविली. ठाण्याच्या प्रसिद्ध अत्रे कट्ट्यावर चित्रांची अनेक व्याख्याने सुद्धा त्यांनी दिली आहेत. ते नेहमीच चित्रकला क्षेत्रात तरुणांना मार्गदर्शन करतात. तसेच ठाण्यात चित्रकारांचे संगठन करुन चित्रदालनात प्रदर्शनं भरवतात व त्याकरवी चित्रकलेचा प्रसारही ते करतात.

त्यांच्या “रे मना” या वार्षिकाला १४ पुरस्कार मिळाले असून त्यांना अनेक सन्माननीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

<!– – चित्रकार

पत्ता : २०३/१/१ ब्रम्हांड को. ऑप. सोसा. आझाद नगर, घोडबंदर रोड ठाणे (प.) ४००६०७

कार्यक्षेत्र : व्यावसायिक चित्रकार – लेखक वक्ता

दूरध्वनी : २५८९६७९७ – भ्रमणध्वनी : ९९२०४११८२८

ई-मेल : vijayraajbodhankar@yahoo.co.in
–>

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*