जोशी, विजय सखाराम

ठाणे शहरात साहित्य, कला यांच्या जोडीलाच पत्रकारितेचाही विकास उत्तमोत्तम झाला आहे. सन्मित्रकार कै.स.पां. जोशी यांनी “सन्मित्र” हे ठाण्यातलं पहिलं स्थानिक वृत्तपत्र सुरु केलं. त्यांचा वारसा पुढे नेणारे आणि “ठाणे सन्मित्र” चे संपादक श्री विजय सखाराम जोशी हे देखील ठाण्यातलं एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्व !

गेली ३० वर्षं ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र “दै. सन्मित्र” चा कारभार पाहणारे विजय जोशी यांनी ७ वर्षं ठाणे सन्मित्र हे व्हिडिओ वार्तापत्रही चालवलं. तसंच “ठाणे समाचार” हे इंग्रजी वृत्तपत्र देखील १ वर्ष चालवलं. विधायक पत्रकारितेच्या माध्यमातून ठाण्यातल्या चांगल्या कामांना दै. सन्मित्रद्वारे ते प्रसिद्धी देत असतात. गुणी कलाकारांना प्रसिद्धी देणारे आणि प्रोत्साहन देणारे लेखन त्यांनी केलं आहे. त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल आदर्श प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*