बापट, वैशाली

वैशाली बापट ह्या मुंबईत राहणार्‍या व स्वावलंबनाची वेगळी वाट निवडलेल्या महिला असून त्या ”वर्धमान ग्राफिक्स”  या मालाडमधील गाजलेल्या प्रिंटींग च्या कारखान्यामध्ये आपल्या कर्तुत्वाचा व कल्पनाशक्तीचा अनोखा संगम साधीत आहेत. या कंपनीमध्ये विवीध प्रकारची बॅनर्स, कलर प्रिंट आऊट्स यांचे वैविध्यपुर्ण प्रकार बनविले जातात. या कंपनीचा आर्थिक पट उलगडायचा झाला तर एक कोटींच्या घरात तिला या व्यवसायातून उत्पन्न मिळते, व ह्या बहारदार घौडदौडीमागे वैशाली यांच्या निरंतर कष्टांचा मोलाचा वाटा आहे. साधारण महिला या छापखान्याच्या क्षेत्रात व तेही सन्मानित पदांवर काम करताना नगण्यच दिसतात. अशा परिस्थीतीमध्ये वैशाली या नव्या पिढीतल्या तरूणींचे स्फुर्तीस्थान बनल्या नसतील तरच आश्चर्य आहे. वैशाली यांचे शालेय शिक्षण श्रीरंग विद्यालयामधून पुर्ण झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात जावून त्यांनी या ग्राफीक्स व छपाईच्या अद्ययावत तंत्रांबद्दलचे सखोल व शास्त्रोक्त ज्ञान संपादन केले. त्या दिवस रात्र कामात व्यग्र असल्या तरी क्रिकेट, चित्रपट व संगीत या तिन्ही प्रांतांबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*