सप्रे, उदय गंगाधर

उदय गंगाधर सप्रे हे व्यवसायाने तांत्रिक बाजूंवर काम करणारे अभियांत्रिक असले तरी आयुष्यभर विवीध कलांमध्ये बेधुंदपणे रमणारा, व हौशीपणाने प्रत्येक कलेमधील सुप्त सौंदर्याचा रसास्वाद घेणारा प्रतिभावंत कलाकार त्यांचा नेहमीच कानोसा घेत आलाय. बी. ई. केमिकल, व डीप्लोमा इन इंटेरिअर डिझाईन अँड डेकोरेशन ह्या पदव्या संपादन करणार्‍या सप्रे यांना लहानपणापासूनच विविध कलाकौशल्यांमध्ये झळकायची, व त्यांना पुर्णपणे आत्मसात करण्याची खुमखुमी होती. चित्रकला व उत्तम रंगसंगतींची जाण तसेच कुठलीही गोष्ट सुबक, रेखीव व उठावदार होण्यासाठी काय करावे लागते, याचे अचुक, उपजत ज्ञान त्यांच्यात मुबलक असल्यामुळे इंटेरिअर डिझाईनिंग व डेकोरेशन या वेगळ्या वाटेकडे वळण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला व तो यशस्वीही करून दाखविला. घर सजविण्यासाठी व रंगविताना कोणती काळजी घ्यावी, कोणता रंग दिल्यामुळे सुर्यप्रकाश अधिक खेळता राहिल, आतील वस्तू व फर्निचर यांची कलात्मक मांडणी कशी असावी कोणत्या गोष्टींमुळे घरातील वस्तूंना टवटवी व जीवंतपणा येईल अशा अनेक गोष्टींवर सल्ले व सुचना देण्याच काम ते करीत असतात. सध्या ते एका खाजगी कंपनीमध्ये वास्तु सल्लागार म्हणून काम करीत आहेत. त्याचप्रमाणे झी. टी. व्ही वरील तांत्रिक बाजू सांभाळणारे व्यावसायिक म्हणूनदेखील ते कार्यरत आहेत. 1999 साली त्यांनी अंताक्षरीमध्ये आपला उत्साही सहभाग नोंदविला होता. 2001 साली अल्फा मराठी वरील इंद्रधनुष्य या मालिकेत एक लहानशी परंतु हृद्यस्पर्शी भुमिका साकारून त्यांच्यातील अष्टपैलु कलाकाराची जाणीव सर्वांना करून दिली होती. अभिनयाप्रमाणेच लेखन हा देखील पहिल्यापासून त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे. ऐतिहासिक लेखन व कादंबरी लेखन या प्रांतांमधील त्यांचे योगदान स्पृहणीय ठरले आहे. ‘रत्नपारखी वराय’, या शिवराय व त्यांच्या जीवाला ज्यांनी जीव दिला होता अशा काही पराक्रमी मावळ्यांच्या आयुष्यांवर बेतलेली कादंबरी क्रमशः अवस्थेमध्ये आहे. मात्र तिचा जो आतापर्यंत एक भाग प्रकाशित झाले त्याला मिळणारा तुडुंब प्रतिसाद पाहून, त्यांची लेखनशैली रसिकांच्या मनाला चांगलीच भिडते आहे हे आवर्जुन म्हणावयास हवे. या कादंबरीचा भाग 1- बाजी पालसकर हा 2009 मध्ये प्रकाशित झाला होता, तर भाग 2- कान्होजी जेधे हा भाग प्रकाशनाच्या मार्गावर आहे. तसेच त्यांचे, ‘झंझावात’ या काहीश्या दुर्लक्षित राहिलेल्या पण बेहद पराक्रमी अशा संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेल्या कादंबरीचे लेखनदेखील जोमाने सुरू आहे. एक गझल ही त्यांनी काव्यबध्द केलेली व सुरेश वाडकरांनी स्वरबध्द केलेली सी. डी. ‘आता उजाडेल’ या नावाने नुकतीच प्रकाशित झाली आहे, व त्यांचे कविमन देखील आज रसिकांच्या हृद्यसिंहासनांवरती मानाने आसनस्थ झाले आहे.

1 Comment on सप्रे, उदय गंगाधर

  1. Hello Sir,

    A slight mistake in Profile : I am NOT working for Zee Television Technical Division & also, I am working in a provate company as an Engineer.

Leave a Reply

Your email address will not be published.


*