शेटे, तुषार

तुषार शेटे हे टी. व्ही. नाईन या वृत्तवाहिनीच्या मुंबई विभागामधले धडाडीचे तरूण पत्रकार आहेत. सिनीयर करस्पॉन्डन्ट या हुद्यावर कार्यरत असलेल्या शेटेंनी या वृत्तवाहिनीच्या अनेक मोहिमा, कारवाया, व भेटींमध्ये हिरिरीने सहभाग घेतला असुन या क्षेत्रातील अनुभव अतिशय दांडगा आहे. प्रवासाची त्यांना लहानपणापासूनच आवड होती! ही आवड आता आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पुर्ण करावयास मिळते आहे या गोष्टीचे त्यांना अतीव समाधान आहे. सामाजिक तळमळ हा देखील त्यांच्या व्यक्तित्वामध्ये प्रकर्षाने जाणवणारा एक विलोभनीय पैलु आहे.

तुषार यांनी आपले शालेय शिक्षण पी. आर. हायस्कुल या शाळेमधून पुर्ण केले. त्यानंतर बी. एन. एन. कॉलेज भिवंडी व बी. एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स येथे आपले महाविद्यालयीन तसेच पदवी शिक्षण पुर्ण करता करताच त्यांना पत्रकारिते विषयी गोडी निर्माण झाली . लेखन व सभोवतालच्या घटनांचे आभ्यासपुर्ण आकलन व विश्लेषण करणे हा त्यांचा ध्यास बनला. झी न्युज व झी मराठी या नामांकित वाहिन्यांवर देखील ‘न्युज रिपोर्टर’ म्हणून ते झळकले.

आपल्या दिलखुलास शैलीमुळे व चेहर्‍यावरून सतत ओसंडणार्‍या आत्मविश्वासामुळे, तसेच प्रसन्नतेमुळे ते अल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यानंतर त्यांनी झी मिडिया सोडून टी. व्ही. नाईनच्या परिवारात सामील झाले. तिथे आता ते आपली कौशल्ये व पत्रकारितेमधील नैपुण्य सिनीयर करस्पॉन्डन्ट म्हणून दाखवित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*