शिरोमणी, सुषमा

मराठी चित्रपटांमध्ये पारंपारिक स्त्री व्यक्तीरेखेला काहिसा छेद देऊन त्याजागी “डॅशिंग वुमन” आणि “तडफदार स्त्री” ची व्यक्तीरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी चपलखपणे साध्य केलं; मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम “भिंगरी” या चित्रपटातून “आयटम सॉंग” चा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींमुळे रुजला आणि तोही मराठमोळ्या ढंगात. अॅक्शन हिरोईन म्हणून वैविध्य भूमिका साकारणार्‍या सुषमा शिरोमणीया मूळ कोल्हापूरच्या व त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर चा; खरंतर सुषमा शिरोमणी यांचा व त्यांच्या कुटुंबियांपैकी अगदी दूरवर चित्रपटांचा संबंध नव्हता, पण योगायोगाने म्हणा किंवा जबरदस्ती अक्षरश: त्या या क्षेत्रात ओढल्या गेल्या ते “दाम करी काम” या चित्रपटामुळे ते देखील अभिनेत्री व निर्मिती म्हणूनच; त्यांचा सुरुवातीचा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या अपयशी ठरला तरीपण त्यानंतरच्या काळात प्रदर्शित झालेले त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर “सिल्व्हर ज्युबली” ठरले. यामध्ये “फटाकडी”, “भिंगरी”, “मोसंबी नारंगी”, “भन्नाट भानू”, “गुलछडी” चा समावेश आहे, विशेष म्हणजे या चित्रपटांची निमिर्ती, दिग्दर्शन, लेखन अशा चौफेर बाबी सुषमा शिरोमणी यांनी समर्थरित्या सांभाळल्या; या चित्रपटां व्यतिरिक्त सुषमा शिरोमणी यांनी “बिजली”, “काका मला वाचवा”, “गुरु किल्ली” तर हिंदीमध्ये “प्यार का कर्ज” आणि “कानून” या चित्रपटांची निर्मिती केली, चित्रपट क्षेत्रात पदार्पण होताच त्यांची या विषयाची गोडी अधिकच वाढत गेली.

“बॉलीवूड कलाकारांना मराठी गाण्यांमध्ये घेऊन काम करण्याचा ट्रेंड असेल किंवा स्टंट सीन्स” अशा अनेक बाबी सुषमा शिरोमणींमुळे मराठीत रुजल्या; विशेष म्हणजे सुषमा शिरोमणी या “कथ्थक नृत्यांगना” असून चित्रपटात देखील लावणीची अदा त्यांनी दाखवून दिली आहे; नृत्याचं शास्त्रोक् शिक्षण सुषमाजींनी शालेय जीवनापासूनच घेतलं आहे.

चित्रपटांच्या निर्मिती व्यतिरिक्त सुषमा शिरोमणींनी “इम्पा” या चित्रपटांसाठीच्या संघटनेचं तीनवेळा अध्यक्षपद भुषवलं असून, पायरसी विरोधी कायदा हा त्यांच्या कार्यकाळातच अमलात आला. यासाठी सुषमाजींनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली होती; याशिवाय “इंडियन मोशन पिक्चर्स डिस्ट्रिब्युटर असोसिएशन” च्या पहिल्या महिला एक्सीक्यटिव्ह, “फिल्म मेकर्स कम्बाइन”, “द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया”, “चेंबर ऑफ मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स”, “एन.एफ.डी.सी”, “फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी”, “सिनेट्टा” या सारख्या संघटनांच्या महत्वपूर्ण पदांवर शिरोमणींनी काम पाहिलं असून, अनेक संघटनांच्या सदस्य सुद्धा आहेत.

सप्टेंबर २०१३ रोजी सुषमा शिरोमणी यांना ” राजमुद्रा जीवनगौरव पुरस्कार”ाने सन्मानित करण्यात आले. ड्रायव्हिंग, स्विमिंग, जिमनॅस्टीक्स, वाचन आणि संगीताची आवड व छंद आहे. “सुषमा शिरोमणी प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड” तर्फे अनेक मराठी चित्रपटांच्या निर्मितीचं काम त्या करत आहेत.

( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )

4 Comments on शिरोमणी, सुषमा

  1. अफलातून ऊर्जा आणि ऊर्मीचा खळाळता झरा म्हणजे सुषमा शिरोमणी

    • प्रिय, सुषमा जी, अगदी लहानपणी पाहिलेले आपले चित्रपट आजही मनाला भुरळ घालतात,आपले विविधतेने नटलेले वक्तीमता खूपच वाखाननेजोगे आहे, मला आपणस भेटनेची खूप इच्छा आहे.आपण मला भेटायला याला या बद्धल विश्वास आहे.धन्यवाद

  2. प्रिय, सुषमा जी, अगदी लहानपणी पाहिलेले आपले चित्रपट आजही मनाला भुरळ घालतात,आपले विविधतेने नटलेले वक्तीमता खूपच वाखाननेजोगे आहे, मला आपणस भेटनेची खूप इच्छा आहे.आपण मला भेटायला याला या बद्धल विश्वास आहे.धन्यवाद

  3. शशितल श्री.उपाध्ये गोमटेश्वर केबल नेटवर्क

    आम्हि तुमचे सगळे चित्रपट ग्रामीन खेडोपाडी यात्रा उरुस सर्व जयंती मध्ये 16 MM पडध्यावर दाखवले त्यातुनच मि माझी मुले भाउ सर्वानि प्रगती केली आज रोजी पेृठ वडगांव (कोल्हापुर) ईंटरनेट या व्यवसायात प्रगती केली. आज तुमची सिनेमाची आठवन जरुर येते

Leave a Reply

Your email address will not be published.


*