सुधीर मोघे

मूळ किर्लोस्करवाडीचे असणार्‍या सुधीर मोघे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ रोजी झाला. १९६८-६९च्या सुमारास मोघे पुण्यात आले. त्या वेळी ते “किर्लोस्कर कारखान्यात” नोकरी करत होते. १९७१ साली त्यांनी “स्वरानंद” सादर करीत असलेल्या “आपली आवड” या रंगमंचीय कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची अनोखी

शैली होती. पण त्यांची आणखीन एक ओळख महाराष्ट्राला होती ती म्हणजे प्रतिभावान साहित्यिक म्हणून; कविता, गीतकार, ललितकार, पटकथा -संवाद लेखक,गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, या क्षेत्रात संचार होता.

सुधीर मोघे यांचे “आत्मरंग”,”गाण्याची वही”,”पक्षांचे ठक्षा(३पेक्षा अधिक आवृत्त्या)”,”लय (एकापेक्षा अधिक आवृत्त्या)”,”शब्द धून”,”स्वतंत्रते भगवती” हे कविता संग्रह प्रकाशित झाले असुन; “अनुबंध”,”गाणारी वाट( एकापेक्षा अधिक आवृत्क्षा)”,”निरांकुशाची रोजनक्षा(एकापेक्षा अधिक आवृत्त्या)” हे गद्यसंग्रह लोकप्रिय ठरले. त्याशिवाय सुमारे ५० पेक्षा अधिक चित्रपटांचे गीतलेखन सुधीर मोघेंनी केले असून त्यापैकी काही चित्रपट म्हणजे “आत्मविश्वास”,“कळत नकळत”,“चौकट राजा”,“जानकी”,“शापित”,“सूर्योदय” आणि “हा खेळ सावल्यांचा”.

मोघे यांची “सखी मंद झाल्या तारका”,”दिसलीस तू फुलले ऋतू”,”मन लोभले”,”मन मनास उमगत नाही”,”सांज ये गोकुळी”,”कुण्या देशीचे आले पाखरु”, “सजणा पुन्हा स्मरशिल ना” ही भावगीते अत्यंत रसिकप्रिय ठरली.

“अज्ञात तीर्थयात्रा”,”भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ”,”भेटशील केव्हा माझिया जिवलगा”,”माझे मन तुझे झाले”,”रंगुनी रंगात सार्‍या” अश्या निवडक गीतांनासुधीर मोघे यांनी संगीत दिले होते, तसंच अनेक मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सुधीर मोघेंनी सांभाळली.

“कविता पानोपानी”,“नक्षत्रांचे देणे : कुसुमाग्रज व शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम”,“नक्षत्रांचे देणे : सुधीर फडके यांचे संगीत असलेल्या गाण्यांचा कार्यक्रम”,“मंतरलेल्या चैत्रबनात”,“स्मरणयात्रा” असे कथाबाह्य स्वरूपाचे तसंच मैफीली विशेष गाजल्या.

चित्रपट, साहित्य क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल आणि वेळोवेळी विविध पुरस्काने सन्मानित करण्यात आले आहे; यामध्ये चार वेळा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून “महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार”,“२ वेळा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून सूरसिंगार पुरस्कार”,“गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार”,“महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य ना.घ. देशपांडे पुरस्कार”,“साहित्यकार गो. नी. दांडेकर स्मृती पुरस्कार”,“२०११ सालचा केशवसुत पुरस्कार”,“ दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘प्रथम वर्ष शांता शेळके पुरस्कार’ लता मंगेशकर यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले आहे.

१५ मार्च २०१४ या दिवशी सुधीर मोघे यांचे दीर्घ आजाराने पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असताना दुपारी अडीचच्या सुमारास निधन झाले.मृत्यू समयी ते ७५ वार्षांचे होते.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

ज्येष्ठ कवी,संगीतकार सुधीर मोघे (9-Feb-2017)

ज्येष्ठ कवी, व गीतकार सुधीर मोघे (18-Mar-2017)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*