वझे, शशिकिरण

कधी कधी माणसाच्या आकांक्षा, स्वप्ने, किंवा एखाद्या विषयाबद्दल त्याच्या मनात असलेले सुप्त आकर्षण व कुतुहल या गोष्टी त्याला एवढया लांबपर्यंत नेवून सोडतात की मग त्या गोष्टींचा पाठपुरावाकरून त्यांच्यात परिपुर्णतेचा व प्रगल्भतेचा उच्चांक गाठणे हेच त्याच्या जीवनातील एकमेव ध्येय उरते., व एवढेच काय तर तीच गोष्ट त्याच्या व्यवसायाचे व उदरनिर्वाहाचे साधनही बनते. मग अशा वेळी त्या माणसाचे शिक्षण व स्पेशलायझेशन कुठल्या विषयामध्ये झाले आहे हा कधीच कळीचा मुद्दा राहात नाही.

शशिकिरण वझे यांच्याबाबतीतही नेमके हेच घडले. शिक्षणाने इंजिनीअर असलेल्या वझेंना वास्तुशास्त्र या भारतामधील सर्वात प्राचीन व गुढ शास्त्राच्या गर्भात प्रवेश मिळवून त्याच्यात दिल्या गेलेल्या अनेक सिध्दांतांची, निकषांची, व तत्वांची शास्त्रोक्त उकल करण्यात प्रचंड रस होता. वास्तुशास्त्रामध्ये त्यांनी अल्पावधीतच वाचन, मनन, व संशोधन या त्रिवेणी मार्गांचा वापर करून विपुल ज्ञानसंपदा आत्मसात केली व सध्या ते वास्तुशास्त्र सल्लागार म्हणून, वैयक्तिक व्यवसायाद्वारे नवीन घर बांधत असलेल्या जोडप्यांना अमुल्य मार्गदर्शन करीत आहेत. त्यांनी सुचविलेल्या वास्तुशास्त्रिक बदलांमुळे व उपाययोजनांमुळे कित्येक जोडप्यांच्या घरगुती आयुष्यांमध्ये आनंदाची व समृध्दीची पालवी नव्याने बहरली आहे.

त्यांच्या या ख्यातीमुळे, ह्या शास्त्राच्या हातात हात धरून त्यांनी कित्येकदा परदेशवारीदेखील केली आहे. भारतातील विविध टोकांना भेट देण्याप्रमाणेच दुबई [सहा वेळा], ओमान [एक वेळा], मॉरिशस [एकतीस वेळा], अमेरिका [ तीन वेळा], लंडन [दोन वेळा], तसेच टांझानिया, डर्बन, जोहान्सबर्ग, न्युझिलँड, सिशेलस अशा ठिकाणांना [प्रत्येकी एक वेळा] भेटी देवून, तेथील आपल्या स्वदेशी बांधवांकडे जावून, त्यांनी आपल्या जवळील ज्ञानाचा व 21 वर्षांच्या व्यावसायिक अनुभवांचा उपयोग, त्यांच्या कौटुंबिक जीवनाची वेल घट्ट करण्यासाठी, व त्यांच्या घरांचा उत्कर्ष साधण्यासाठी कल्पकपणे केला आहे.

अशा प्रकारे जागतिक किर्तीचे व जगातील आघाडीचे वास्तुविशारद व वास्तुशास्त्रसंशोधक म्हणून त्यांच्या या कार्यास अमाप प्रसिध्दी मिळाली आहे.

जन्म : ११ डिसेंबर १९४५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*