संत गुलाबराव महाराज

Gulabrao Maharaj

(६ जुलै १८८१-२० सप्टेंबर १९१५)

विदर्भातील एक सत्पुरूष. अमरावतीजवळ माधान येथे जन्म.

चार महिन्याचे असतानाच त्यांना अंधत्व आलें. जातीने कुणबी. बालपणापासून ज्ञानेश्वरीचा व्यासंग. स्वतःला ज्ञानेश्वरीकन्या व कृष्णपत्नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हे ते धारन करीत. भगवतदेह अनध्यस्त, विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाशपावत नाही, हा भक्तीसिध्दांत शांकर तत्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधूराव्दैवत दर्शनाचा पुरस्कार केला(मधूरा भक्ती). सारख्या-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी प्रतिपादले.

भरतातील नानाविध धार्मिक संप्रदाय; हिंदू, बौध्द, जैनाधी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मूसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत, असे समन्वयात्मक विचार त्यांनी प्रतिपादन केले. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्वज्ञान इ. पाश्चात्य विचारसरणींचे त्यांनी खंडन केले. आर्य “वंश“ असून तो बाहेरून भारतात आला, हे माक्स म्यूलर व लोकमान्य टिळकांचे मत त्यांना मान्य नव्हते. २,५०० वर्षापूर्वी वैदिक धर्मच तेवढा विश्वव्यापक होता, असे ते प्रतिपादन करीत. प्राचीन न्यायशास्त्र हे प्रामूख्याने आर्यांचे भौतिकशास्त्र होते.

प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी (साउंड), इथर, इलेक्ट्रान्स, उष्ण्ता, गती, प्रकाश, विमानविदया, अणूविज्ञान वगैरंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखवून दिले. पण परंपरा लुप्त झाल्यामुळे त्यांचे स्पष्टीकरण होण्यासाठी आस्तिक-नास्तिक सर्व संस्कृत पंडितांनी मिळून न्यायशास्त्रातील प्रत्यक्षख्ंडाचा अभ्यास आणि विस्तार केला, तर नवीन भौतिक शोध लागतील आणि आर्यांचे भौतिकशास्त्र पुन्हा उदयाला येईल, असे साधर व तर्कशुद्ध विवेचन करून न्यायशास्त्रातून भौतीक शोध लावण्याची दिशा महाराजांनी दाखवून दिली.

1 Comment on संत गुलाबराव महाराज

  1. आपला तर्क चुकिचा आहे महाराजांचा जन्म लोणी टाकळि अमरावति

Leave a Reply

Your email address will not be published.


*