आहिरे, संकेत

संकेत अहिरे यांनी जर्मनी सारख्या प्रतिष्ठीत व तंत्रज्ञानप्रेमी देशात आपल्या प्रगल्भ बुध्दिमत्तेचा व अफाट कल्पनाशक्तीचा सुंदर मिलाफ साधला असून, आपल्या कार्यक्षमतेने सर्वच भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. कन्सेप्ट मिडीया वर्क्स ही जर्मनीमधील प्रथितयश व वेब तसेच संगणक क्षेत्रातील कोणत्याही समस्येवर रामबाण इलाज असणारी कंपनी आहे. ग्राफिक, प्रिंट, कॉपीरायटींग, प्रोग्रामिंग, फोटोग्राफी, अशा बहुआयामी क्षेत्रांमध्ये काहीतरी भरीव व भव्य दिव्य करण्याची इच्छा असलेल्या ध्येयवेडया तरूणांसाठी ही कंपनी नेहमी खुली असते. आकर्षक व सुटसुटीत ब्रोशर्स, कॅटलॉग्ज, बिझनेस पेपर्स बनविणे, व वेब तसेच मिडीया क्षेत्रामधील प्रत्येक छोटया मोठया समस्येवर ग्राहकांना कल्पक सल्ले देण्याचे व वेळ पडल्यास प्रत्यक्ष कृती करण्याचे कार्य ही कंपनी करत असते. या कंपनीमध्ये आपल्या स्वकर्तुत्वावर उत्तुंग प्रतिभेवर झळकलेला मराठमोळा चेहरा म्हणजे संकेत अहिरे. वेब डिसायनिंग मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या अहिरे यांनी आपले शालेय शिक्षण रचना हाय स्कुलमधून पुर्ण केले.

लहानपणापासून त्यांचा ओढा वेगवेगळ्या कलांच्या दिशेने जास्त असल्यामुळे त्यांनी चाकोरीबध्द शिक्षणवाटा न चोखंदळता, मास कम्युनिकेशन ही त्यावेळी बर्‍यापैकी निर्जन असलेली वाट निवडली. तंत्रज्ञान, कला व कल्पनाशक्तीचा सुवर्णमध्य गाठु शकणारा मेंदु त्यांच्याजवळ असल्यामुळे मास्टर्स इन मास कम्युनिकेशन ही पदवी त्यांनी एच. पी. आर्टस व आर. वाय. के. कॉलेजमधुन, चांगल्या गुणांसहित संपादन केली. अहिरे यांनी आतापर्यंत स्टार माझा (आताचे एबीपी मा़झा) व टि. व्ही. नाईन मुंबई या नामांकित वाहिन्यांसाठी व्हिडीयो एडिटर चे कामही केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*