मालाडकर, सागर

सागर मालाडकर हे मराठीसृष्टी.कॉम या अग्रगण्य मराठी वेबपोर्टल वर लेखक आणि मुलाखतकार म्हणून कार्यरत असून आज पर्यंत महाराष्ट्रातील अनेक नामांकीत व अप्रकाशित मान्यवरांच्या मुलाखती त्याने घेतल्या आहेत. मराठी चित्रपट आणि याक्षेत्रातल्या कलाकारांवर माहितीपूर्ण लेखन व संशोधन करण्याचे काम करत आहे.

सागर मालाडकर हा मूळ मालाड, मुंबई चा रहिवासी असून त्याचे शालेय  शिक्षण “एस.टी.एस.मिशन इंग्लिश हायस्कूल” मधून पूर्ण झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण शीव येथील “एस.आय.ई.एस” तर पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावर अनेक वर्ष निर्मिती सहाय्यक तसंच निवेदक व रेडिओ जॉकी, त्याशिवाय महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, द ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रांमधून आणि विविध नियतकालिकांमधून लेखन, वार्तांकन देखील केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*