सायन्ना, विठ्ठल

मुंबईच्या बांधकाम इतिहासामध्ये विठ्ठल सायन्ना यांचे नाव अत्यंत आदराने व गर्वाने घेतले जाते.

ठाणे व मुंबईत विस्तीर्ण पसरलेल्या व वेगवेगळ्या आकारांनी, तसेच बांधकामाच्या शैलींनी नटलेल्या गगनचुंबी इमारतींचे, विस्तीर्ण जाळे विणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबई व ठाण्याची वास्तू घडण करणारे प्रसिध्द बांधकाम ठेकेदार अशी त्यांची संपुर्ण भारतामध्ये किर्ती पसरलेली होती. याला कारणेही तशीच आहेत. मुंबईच्या जन्मापासून तिच्या गळ्यामधील दुर्मिळ अलंकाराचे काम करणारे, गॉथिक वास्तुशास्त्राचा अद्वितीय नमुना असलेले, व संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रसिध्द होणार्‍या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीमध्ये नोंद झालेले पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकाचा काही भाग त्यांनी बांधला होता.

याशिवाय मुंबईतील अनेक इमारती व पायाभूत सुविधांची बांधणी त्यांच्या हस्ते झाली. मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ( हल्लीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय) , स्मॉल कॉसेस कोर्ट, व इन्स्टीटयूट ऑफ सायन्स या इमारतींच्या निर्मीतीची जबाबदारी अतिशय समर्थतेने त्यांनी पेलली होती. त्यांचे सुपुत्र नारायण सायना यांची गणतीदेखील मुंबईतल्या दर्जेदार व नामांकित इमारत कंत्राटदारांपैकी होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याच व्यवसायामध्ये उंच भरारी मारली.

त्यांच्याच नावाने ठाणे येथे विठ्ठल सायन्ना मंदीर उभे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*