आदिक, रामराव वामनराव

कायदेतज्ज्ञ अशी ओळख असणार्‍या रामराव आदिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल, राज्य विधी आयोगाचे अध्यक्ष, शासनाचे मानद कायदे सल्लागार अशी जबाबदारीची पदे सांभाळणार्‍या आदिक यांची १९८३ साली उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. तत्पूर्वी त्यांनी पाटबंधारे, समाजकल्याण, आदिवासी कल्याण, विधी व न्याय इत्यादी खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी कुशलतेने पार पाडली.

अतिशय अभ्यासू आणि मनमिळावू नेता म्हणून त्यांची कारकीर्द गाजली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*