रामदास पाध्ये

रामदास पाध्ये हे भारतामध्ये तसेच परदेशामध्येही बोलक्या बाहुल्या आणि शब्धभ्रम या कलेमुळे नावाजले गेलेले हाडाचे कलाकार आहेत. त्यांनी बनविलेले व जिवंत केलेले अनेक बाहुले जगभरच्या रसिकांनी आपलेसे केले आहेत. टेलिव्हीजन मालिका, जहिराती, सिनेमे यांच्यातून सुध्दा ते आपल्या मनोरंजनासाठी भेटीस आले आहेत. आपल्या बाहुल्यांच्या कार्यक्रमांमधून बालविवाह, बालशिक्षण, ड्रग्स ची समस्या, जागतिक तापमानवाढ अशा महत्वाच्या मुद्दांवर ते नेहमीच भाष्य करतात.

त्यांच्या जादुई बोटांचा स्पर्श झाला की त्या निर्जिव जीवांना नवं जीवनं मिळतं, ते रसिक जनांशी संवाद साधतात, त्यांना कधी हसवतात, रिझवतात, हास्याच्या कल्लोळामध्येही त्यांच्या जाणीवांचे पडदे खुले करून जातात. त्यांना प्रेम शिकवतात, संवेदनशिलतेचा मुलामा लावतात. मग तो लिज्ज्त पापड जहिरातीमधला बनी असो किंवा ‘दिल हे तुम्हारा’ मधील सर्वांना हवाहवासा वाटणारा बाहुला असो अशा निरनिराळ्या बाहुल्यांद्वारे रामदास पाध्ये प्रत्येक प्रयोगाला एखाद्या नवीन विचारांची, व कल्पनांची कुपी प्रेक्षकांसमोर उघडत असतात.

रामदास पाध्ये यांना बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम भरविण्याची प्रेरणा, व या अनिश्चीत व पठडीपासून वेगळ्या क्षेत्रात घुसण्यासाठी लागणारं बळ व तेज त्यांच्या बाबांकडून म्हणजेच वाय. के. पाध्ये यांच्याकडून मिळाले. लहानपणापासून इतरांच्या हुबेहूब नकला करण्याची त्यांची कला, विवीध लोकांचे निरनिराळे आवाज व बोलण्याच्या तर्‍हा, तसेच बदलत्या भावनांनुसार लोकांच्या आवाजात आपोआप येणारे चढ उतार लिलया पेलु शकणारा असा त्यांच्या आवाजाचा दर्जेदार पोत, आजुबाजूंच्या व्यक्तींचे आभ्यासपुर्ण निरीक्षण, व उपजत मिश्कीलपणा या त्यांच्या गुणांमुळे ते मित्रपरिवारात व कुटूबीयांमध्ये खुप प्रसिध्द होते.

रामदास पाध्ये यांच्यामधील व्यावसायिक कलाकाराची घडण अर्थातच त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी त्यांचा स्वतःचा असा पहिला कार्यक्रम सादर केला होता. यानंतर त्यांनी परत कधीच मागे वळून पाहिले नाही. आज ते जागतिक किर्तीचे कलाकार बनले आहेत. या त्यांच्या घवघवीत यशामागे मायबाप रसिकांनी त्यांच्यावर मनापासून केलेले प्रेम व दिलेले आशीर्वाद तर आहेतच, शिवाय त्यांच्यामधील चौफेर बाबींचा विचार करणारा, सतत नवीन व संशोधकपणे विचार करून प्रत्येक विषयास तोंड फोडणारा प्रतिभावंत व प्रयोगशील कलाकारसुध्दा आहे.

रामदास पाध्ये मॅकेनिकल इंजिनीअर आहेत ही गोष्ट बर्‍याच जणांना माहितही नसेल. ते केवळ बाहुल्यांना स्वतःच्या विचारांवर नाचवण्याबरोबरच त्यांच नृत्यसंचालन, संवाद, त्या खेळाची पुर्ण संहिता लिहीणे, परिस्थीतीनुसार त्या बाहुल्याच्या तोंडावर कुठल्या मुद्रा असतील हे ठरवणे या सर्व गोष्टी ते स्वःतच खपुन करतात. त्यांनी तयार केलेले विवीध बाहुले जगाच्या कानाकोपर्‍यांतून नावाजले गेलेले आहेत.

मर्लिन मुनेरो या जगप्रसिध्द हॉलिवुड अभिनेत्रीच्या स्मृतीप्रीतर्थ्य आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिला मानवंदना देण्यासाठी ज्या विवीध कलाक्षेत्रातील रथी- महारथींचा सामावेष करण्यात आला होता, त्यात पाध्येंच्या खास बाहुल्यांच्या कार्यक्रमानेसुध्दा उपस्थितांमध्ये आपली चांगलीच छाप पाडली होती. मार्मिक विनोदीबुध्दीने प्रेक्षकांमध्ये हास्याची कारंजी फुलवताना त्यांना विवीधांगी विचार करण्यास प्रवृत्त करणारे रामदास पाध्ये यांना या कलेचे शास्त्रोक्त ज्ञान व प्रशिक्षण देणारी एक संस्था काढायची इच्छा आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*