बर्वे, रघुनंदन

रघुनंदन बर्वे हे सर्वपरिचीत व कौशल्यवान लेखक, दिग्दर्शक, एडिटर, व फ्री लान्सींग करणारे कलाकार आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल योगदान समाजाच्या विवीध स्तरांमधुन वाखाणलं गेलेलं आहे. झी टॉकिज सारख्या प्रतिष्ठीत चित्रपट निर्माण कंपनीमध्ये कायमस्वरुपी, लेखक व दिग्दर्शक रुजु झालेल्या रघुनंदनने त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचा उत्तम फायदा मिळवला आहे. मराठी व्यासपीठ गाजवलेल्या व सर्वसामान्य रसिकांच्या हृद्यास स्पर्शुन गेलेल्या अनेक मालिकांची, चित्रपटांची व म्युझिक अल्बम्सची लांबलचक यादी त्याच्या सफाईदार दिग्दर्शनाखाली तावुन सुलाखून निघालेली आहे. रघुनंदनने त्याच्या गौरवास्पद कारकिर्दीमधे वेगेवेगळ्या रथी महारथींसोबत, बड्या म्युसिक कंपन्यांसोबत तसेच नामांकित दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करून हजारो कडु- गोड आठवणींची, व अनुभवांची समृध्द खाण निर्माण केली आहे. सध्या त्याने सुड माझा नवसाचा या पुर्वप्राथमिक अवस्थेत असणार्‍या मराठी चित्रपटाच्या निर्मीती प्रक्रियेसाठी आपले हात तयार ठेविले आहेत. ‘मन बेधुंद’ या मराठी सागितीक अल्बमच्या दृष्यप्रसंगांची आकर्षक मांडणी व रचना करून त्या दृष्यफितीला रसिकतेच्या एका वेगळ्याच बेधुंद उंचीवर घेवून जाणारा तो हाच दिग्दर्शक!!

‘घंटागाडी’, ही नालासोपारा नगर परिषदेने निर्माण केलेली, व कचरा व टाकाऊ पदार्थांच्या व्यवस्थापन व्यवस्थेवर लोकांमध्ये अनोखे प्रबोधन घडविणारी माहितीपर डॉक्युमेंटरी त्याने दिग्दर्शित केली होती. ई टी. व्ही. या भारतामधील सर्वात मोठया, व जवळ जवळ सर्व राज्यांमध्ये सुदृढ प्रादेशिक जाळे विणलेल्या वाहिनीसाठी त्याने कार्यकारी निर्मात्याचे काम करून टेलिव्हीजन क्षेत्रात एक चांगली वट निर्माण करण्यात यश मिळविले आहे. ‘असंभव’, या झी मराठीवरील प्रचंड गाजलेल्या मालिकेने सालोसाल मरगळलेल्या, व रखडलेल्या दैनिक कौटुंबिक मालिकांमध्ये रमणार्‍या प्रेक्षकांमध्ये नवचैतन्याची लाट आणली होती. या मालिकेच्या प्रमुख साहाय्यक दिग्दर्शकाची भुमिका त्याने चोख बजावली. वेगळा विषय, उत्तम मांडणी व उत्कंठा ताणणारे कथानक यांमुळे या मालिकेने टेलिव्हीजन क्षेत्रामध्ये अद्भुत क्रांती घडवली. मिशन चँपियन या मराठमोळ्या संवेदनशील चित्रपटाला सातासमुद्रापार नेण्यातही रघुनंदनचा सिंहाचा वाटा होता. या चित्रपटाने २००७ च्या म. टा. सन्मान सोहळ्यामध्ये, सर्वोत्कृष्ठ स्क्रीन प्ले या पुरस्कारावर आपले नाव कोरले. २००७ मध्ये झालेल्या झी गौरव या नामांकित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये, सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाबरोबर सर्वोत्कृष्ठ कथा, संवाद, बालकलाकार, व स्क्रीन प्ले अशा जवळजवळ सर्वच तांत्रिक व अतांत्रिक बाजुंसाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. केवळ पुरस्कार व सन्मान देवून या चित्रपटाने जगभरातल्या प्रेक्षकांवर घातलेली मोहिनी कमी झाली नाही, तर आशियाई चित्रपट महोत्सव, शांघाय चित्रपट महोत्सव या जागतिक स्तरांवर होणार्‍या रत्नपारखी स्पर्धांमध्ये या चित्रपटाने आपले स्थान मिळवले होते व समस्त मराठी माणसांची मान गर्वाने उंच केली होती.. अशा प्रकारे मराठी मालिकांप्रमाणे, मराठी चित्रपटसृष्टीमध्येही रघुनंदनने आपल्या उत्तुंग कर्तुत्वाची यशस्वी भरारी मारली.

याशिवाय तुझ्याविना, या झी मराठीवरील मालिकेत प्रमुख साहाय्यक दिग्दर्शक, कोवळीक, व आपली माणसं या दुरदर्शनवर प्रसारित होणार्‍या मालिकांमध्ये तर थरार या झी मराठीवरील प्रसिध्द मालिकेमध्ये साहाय्यक दिग्दर्शक, अशा नानाविध मालिकांमध्ये व भुमिकांमध्ये असामान्य कार्य करून त्याने आपल्यातील दर्जेदार दिग्दर्शकाची मुळे फार खोलवर घुसवली आहेत. फाईन हर्बल हेयर डाय, या हाय डेफिनेशन तंत्रांनी शुट केली गेलेली अ‍ॅड फिल्म, ट्रोपिकल कार रेफ्रिजरेटर, निर्मल अ‍ॅलो पल्प ज्युस, निर्मल केश पुर्ती, विन्टोजीनो, अशा अनेक अ‍ॅड फिल्म्स तसेच सन्त एकनाथ या एका तासाच्या टेलीफिल्मचे एडिटींग अशा अष्टपैलुत्वाची गरज असणार्‍या, जबाबदार्‍या त्याने सहजप्णे पार पाडल्या आहेत.

3 Comments on बर्वे, रघुनंदन

  1. Raghu kharach ek khup guni kalakar….director ahe….maza mitra asanyacha mala abhiman ahe….Raghya keep it up…. Navin project sathi all the best….

Leave a Reply

Your email address will not be published.


*