अशोक बागवे (प्रा.)

बागवे, (प्रा.) अशोक

कवी म्हणजे …. कवी म्हणजे …. कवी असतो
साहित्य सूर्यमालेतला तो रवी असतो.

असं कवीबद्दल म्हटलं जातं. आपल्या प्रतिमा संपन्नतेमुळे शब्द चित्र उभारणा कवी हा खरोखरच जादूगारच असतो. असे मान्यवर कवी ज्यांनी आपल्या गावरानगीतांतून , काव्यातून रसिकांना रसिकांना रिझवलं ते कवी म्हणजे अशोक बागवे !

कवी अशोक बागवे हे नाव ठाणे करांना काही नवीन नाही. विविध सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रमांत, काव्यसंमेलनात आपण त्यांचं नाव नेहमी ऐकतो, वाचतो हेही सांगायला नको. गेली २० वर्ष ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले कवी अशोक बागवे यांनी कवी म्हणून आपली एक वेगळी छाप साहित्यवर्तुळात उमटवली आहे.

आलम, आज इसवीसन, गर्द निळा गगनझुला, मंदीला हे काव्यसंग्रह, असायलम, आमचे येथे श्रीकृपेकरुन, राधी यांसारखी राज्यनाट्यस्पर्धा पारितोषिक विजेती नाटकं; मृतिकाघट, अश्वत्थामा, माचिस यांसारख्या एकांकिका असं विपुल लेखन त्यांनी आजवर केलं आहे. तसंच सुमारे ५० चित्रपटांसाठी बागवे यांनी गीतलेखन केलं आहे.

मनातील ठाणे :
ठाणे शहराबद्दल बोलताना ते म्हणतात; काल ठाणे हे एक छोटं नगर होतं. आज ठाणे शहरझाले असून ते झपाट्याने वाढले आहे. त्यांच्यासारख्या कवीला या शहरातल्या निसर्गात रमायला आवडतं. ठाण्यातले तलाव, येऊरचा रम्य परिसर आणि त्या पार्श्वभूमीवर ठाण्याचं होणारं महानगर हा विरोधाभास वाटत असला तरी ठाण्यानं जपलेलं मूळ सौंदर्य ही ठाणेकर म्हणून अभिमान वाटावी अशीच बाब आहे. उद्याचं ठाणे हे नक्कीच एक संस्कृती जपणारं महानगर होईल यात शंका नाही. असं अशोक बागवे म्हणतात.

बायोडाटा व पुरस्कार : त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांना सर्वोत्कृष्ट कविता संग्रहाचा कवी केशवसुत पुरस्कार, बालकवी पुरस्कार, कविता राजधानी पुरस्कार, आरती प्रभू पुरस्कार, गोजिरी चित्रपटातल्या गीतासाठी ग.दि.मा. पुरस्कार आणि झी ॲ‍वॉर्ड , यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*