प्रतिभाताई पाटील

Patil, Pratibhatai

भारताच्या माजी राष्ट्राध्यक्षा आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असणार्‍या श्रीमती प्रतिभाताई देवीसिह पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. घरची श्रीमंती त्यात पाच भावात एकच लाडकी बहीण त्यामुळे लहानपण लाडाकोडात गेलं. एम्. जे. कॉलेज, जळगाव येथून एम. ए. पदवी घेतल्यानंतर गव्हर्मेंट लॉ कॉलेज, मुंबई येथून एल. एल. बी. ची परीक्षा देऊन त्या कायदेतज्ज्ञ झाल्या.
श्रीमती प्रतिभाताई देवीसिह पाटील २५ जुलै २००७ ते २५ जुलै २०१२ या दरम्यान भारताच्या राष्ट्राध्यक्षा होत्या.
१९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यांची एस. टी. महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. ७ जुलै १९६५ ला अमरावतीच्या शेखावतांच्या घरात प्रवेश केला. पहिल्यांदाच मंत्री झाल्या आणि सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्याच्या मंत्री होत्या. आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारूबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री, विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड १९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
१९८५ साली राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून निवडून आल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या. १९८९ ला त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ ला एदलाबाद मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. त्यांनी राजस्थानचे राज्यपालपदही भूषविले होते.
नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या.‘प्रिटोरिया’ येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. ‘महिला आर्थिक विकास महामंडळ’ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
‘पाळणाघर’ मदत योजना स्थापन केली. ‘महिला बँकांची’ स्थापना केली. ‘आदिवासी विकास योजना’,‘वसंतराव नाईक महामंडळ’, ‘अण्णाभाऊ साठे महामंडळ’ आणि ‘ज्योतिबा फुले महामंडळ’ इत्यादि महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरींग कॉलेज काढले.
## Pratibhatai Patil

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*