रेणके, पल्लवी

पल्लवी रेणके या भटक्या-विमुक्तांसाठी पूर्ण वेळ काम करणार्‍या एक कर्तुत्ववान कार्यकर्त्या आहेत. शिक्षणाने त्या एल एल बी असल्या तरी स्वतःची नाळ मात्र त्या विसरलेल्या नाहीत. शहरातल्या प्रतिष्ठीत उद्योजकांच्या फिर्यादी लढवून बक्कळ पैसा कमवण्याच्या  संधी उपलब्ध असून सुध्दा त्या उच्च न्यायालयात किंवा इतर कोर्टांमध्ये जी काही वकिली करतात ती भटक्या-विमुक्तांच्या हितासाठीच.

मुंबईत गोंधळी’ कुटुंबात जन्मलेल्या पल्लवी रेणके यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले; उच्च शिक्षणासाठी पल्लवी रेणके सोलापुरात गेल्या. उच्च न्यायालयात वकिली सुरू केल्यानंतर लगेचच भटक्या-विमुक्तांच्या अनेक समस्यांना आधोरेखित करण्याच व भट्क्या जातींचा एकत्रीत आवाज भारतीय न्यायव्यवस्थेत बुलंद करण्याच श्रेय त्यांना दिलं जातं, यात कोणाला नवल वाटू नये. या समस्या मुळापासून उखडून टाकण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची भटकंती सुरू केली. यातील अनेक समस्यांना दुर करणे तर न्यायालयीन कायदे कानुनांच्याही आवाक्यापलीकडचे होते. खरेतर या समाजाच्या अनेक आधिव्याधी पल्लवी यांना जन्मानेच समजल्या होत्या. पण या विशाल समाजातल्या प्रत्येक जातीची रचना वेगळी. भाषा भिन्न. लोकरीती आणि चाली वेगळ्या. अनेक जातींच्या कपाळावर जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का समाजानेच मारून ठेवलेला होता. अंधश्रद्धांचे आणि अज्ञानाचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले. ही प्रतिकूल परिस्थिती अभ्यासताना पल्लवी यांना वाटले की, महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांसाठी काम करणार्‍या अनेक संघटना आधीपासूनच आहेत. या सगळ्या संस्था आणि संघटनांसाठी एक समान व्यासपीठ तयार करण्याची खरी गरज आहे. त्या दिशेने मग त्या कामाला लागल्या. राज्यातल्या संघटनांशी त्यांनी संपर्क साधला. नेत्या-कर्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यातूनच ‘लोकधारा’ या समान व्यासपीठाचा जन्म झाला. महाराष्ट्रातल्या ३२ संघटना या ‘लोकधारा’शी संलग्न झाल्या. विशेष म्हणजे, पुढे देशातल्या ११ राज्यांमधल्या भटक्या-विमुक्तांच्या संघटना ‘लोकधारा’शी जोडल्या गेल्या.

प्रत्येक जातीने स्वतंत्र संघटना काढण्यात शक्ती विभागली तर जातेच शिवाय सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंदितही करता येत नाही, असं त्या मानततत . स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी लक्षावधी भटक्या-विमुक्तांना मतदानाचे कार्ड नाही किंवा रेशनकार्डही अजुन मिळाले नाही. म्हणजे, भारताच्या नागरिकत्वाचा त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही. अशा २५ हजारांहून अधिकांना ‘लोकधारा’च्या प्रयत्नांनी कार्डे मिळाली.

या समाजात जागृती नसल्याने केंद व राज्य सरकारांच्या असंख्य कल्याणयोजना त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाहीत. त्या पोचवण्याचे प्रयत्न अकराही राज्यांमध्ये करण्यात आले. त्याचे कौतुक युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) नेही केले. महिलांचे बचतगट, कायदेशीर सल्ला, आश्रमशाळांना जोडून जीवन शिक्षण केंद, मौखिक साहित्य व संस्कृतीचा अभ्यास असे अनेक उपक्रम आज ‘लोकधारा’ने चालवले आहेत. पल्लवी रेणकेंच्या कौतुकास्पद कामाचा यथोचित सन्मान त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे तरुणांना दिला जाणारा पुरस्कार देवून करण्यात आला.

( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )

2 Comments on रेणके, पल्लवी

  1. I had read some articles on tribals written by you, in Loksatta a few years back. I am intersted in knowing about the books written by you, if any. Thanks and Regards

Leave a Reply

Your email address will not be published.


*