नारायण हरी आपटे

कादंबरीकार, कथालेखक

जन्म : ११ जुलै १८८९ (समडोळी – सांगली जिल्हा)
मृत्यू :  १४ नोव्हेंबर १९७१  (कोरेगाव)

ख्यातनाम कादंबरीकार, कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्म ११ जुलै १८८९ रोजी झाला.  त्यांचे लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे. त्यांनी जवळपास पस्तीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतल्या काही ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबर्‍या आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ७५ इतकी आहे.

ना.हं. ची पहिली कादंबरी “अजिंक्यतारा”, “लांछित चंद्रमा”, “राजपुतांचा भीष्म, “संधिकाल” इ. कादंबर्‍या गाजल्या. `कुंकू’ हा प्रभात चित्रपटसंस्थेचा चा गाजलेला चित्रपट, ना.ह.आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित आहे

१९६२ सालच्या सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.

नामसाधर्म्यामुळे बर्‍याचदा `नारायण हरी आपटे’ आणि `हरी नारायण आपटे’ यांच्यात गल्लत केली जाते.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

‘मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक’ ह. ना. आपटे (4-Mar-2017)

मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक – ह. ना. आपटे (5-Mar-2018)

मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक हरी नारायण उर्फ ह.ना.आपटे (10-Mar-2022)

# Narayan Hari Apte

#आपटे नारायण हरी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*