मुरलीधर देविदास आमटे (बाबा आमटे)

Amte, Murlidhar Devidas

समाजसुधारक, विचारवंत, कवी आणि कुष्ठरोग निर्मूलनाचे अफाट काम उभारणारे एक भारतीय व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरलीधर देविदास आमटे तथा बाबा आमटे.

विदर्भातील एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात २६ डिसेंबर १९१४ साली त्यांचा जन्म झाला. बी. ए., एल. एल. बी. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी वकिली केली. पण १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ते महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या सहवासात आले आणि त्यानंतर कुष्ठरोग/महारोग सेवा समितीची त्यांनी स्थापना केली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा येथे कुष्ठरोग्यांसाठी ‘आनंदवना’ची स्थापना केली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अश्या इतर सामाजिक चळवळींतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. १९५२ साली वरोडयाजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.

बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांवर केवळ वैद्यकीय उपचार करण्याइतकचं मर्यादित काम न करता कुष्ठरोग्यांना मानसिक आधार मिळवून देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या. त्यातून त्यांच्या पुनर्वसनाचं कार्य घडवून आणलं. त्यामुळे कुष्ठरोगी स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि त्यांच्याकडे बघण्याचा समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडून आला.

बाबा आमटे हे एक कोमल मनाचे कवीही होते. त्यांचे काही कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यात समाजभानाचे दर्शन घडते. ‘ज्वाला आणि फुले’, ‘सार्वजनिक संस्थांचे संचालन’, ‘माती जागवील त्याला मत’, ‘उज्ज्वल उद्यासाठी’, ‘करुणेचा कलाम’ हे त्यांचे संग्रह आहेत. कल्पकता, प्रतिकात्मकता, विचार प्रवृत्त करणारी भाषा ही आमट्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य आहेत.

१९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. याशिवाय आमट्यांनी कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापल्या :

आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)
सोमनाथ – मूल (चंद्रपूर)
अशोकवन – नागपूर
लोकबिरादरी प्रकल्प – नागेपल्ली,
लोकबिरादरी प्रकल्प – हेमलकसा.

बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. १९८५ साली शंभर दिवसांच्या भारत जोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे व विकास आमटे, त्यांच्या सुना व नातू आमट्यांनी आरंभलेले कार्य पुढे नेत आहेत. ९ फेब्रुवारी २००८ रोजी त्यांचे दुखःद निधन झाले.

साहित्य

आमट्यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत :

‘ज्वाला आणि फुले’ – कवितासंग्रह
‘उज्ज्वल उद्यासाठी’ (काव्य)
‘माती जागवील त्याला मत’

बाबांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय अतंरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

पद्मश्री १९७१;पद्मविभूषण १९८६;अपंग कल्याण पुरस्कार (Welfare of the Disabled Award); १९८६

महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुलॆ पुरस्कार; १९९८गांधी शांतता पुरस्कार; १९९९ सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार; १९९९ महाराष्ट्र भूषण पुरस्कार; २००४ (महाराष्ट्र सरकार चा सर्वोच्च सन्मान) १-मे-२००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.

मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार १९८५;पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार १९८६;महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार १९७४;राष्ट्रीय भूषण पुरस्कार १९७८;जमनालाल बजाज पुरस्कार १९७९;एन डी दिवान पुरस्कार १९८० (National Society for Equal Opportunities for the ‘Handicapped’ (NASEOH), Mumbai); राजा राम मोहनराय पुरस्कार १९८७;भरतवास पुरस्कार २००८;जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार १९८८;महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार १९९१;कुमार गंधर्व पुरस्कार १९९८; जस्टिस के एस हेगडे पुरस्कार, कर्नाटक १९९८;गौरव डि.लिट् – नागपूर विद्यापीठ १९८०;गौरव डि.लिट् – पुणे विद्यापीठ, १९८५-८६; देशिकोत्तम (गौरव डॉक्टरेट) १९८८ -विश्वभारती, शांतीनिकेतन , पश्चिम बंगाल

रॅमन मॅगसेसे पुरस्कार, डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका – १९८३ .कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार, संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार (United Nations Human Rights Prize), १९९८आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका १९८९, टेंपल्टन् बहुमान,अमेरिका (मानवतावादी कार्यासाठी) १९९०;पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर १९९१

पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार १९९१;राईट लाईव्हलीहूड अवार्ड, स्वीडन – १९९१. (पर्यायी नोबल पुरस्कार) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी मेधा पाटकर यांच्या सोबत संयुक्तपणे)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

## Murlidhar Devidas Amte

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*