पिंपळे, मिनार

मिनार पिंपळे यांनी त्यांच “बी. एस. डब्ल्यू.”  व  “एम. एस. डब्ल्यू” चं शिक्षण चर्चगेटमधील निर्मला निकेतन या कॉलेजमध्ये पुर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना झोपडपट्यांमधील रहिवाश्यांसाठी काहीतरी भव्य, चांगले काम करण्याची मनी प्रचंड हुरहूर होती. पदव्योत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी युवा या संघटनेची स्थापना केली. मुंबईमधील झोपडपट्टयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपाय योजना सुचवल्या व प्रत्यक्ष अंमलात सुध्दा आणल्या. परंतु या योजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी स्थानिक बेरोजगार तरूणांची मदत घेतली. त्यांच्याशी जिव्हाळ्याच नात निर्माण करून त्यांना संघटित केलं. आज त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व इतक्या वर्षांच्या साधनेमुळे आज अनेक झोपडपट्टयांमध्ये धडाडीच्या तरूणांची पथके उभी राहिली आहेत. हे तरूण स्वतःच या वस्त्यांच्या विकासासाठी अनेक उपाय योजना राबवीत आहेत. त्यांच्या बाहुंना बळ व पाठीला कणा देण्याचे काम मात्र युवाचे स्वयंसेवक करीत आहेत. अनेक तरूणांना गुन्हेगारी मार्गांपासून परावृत्त करून समाजाच्या आदर्श पुर्नरचनेसाठी त्यांना मानसिक व शारिरीक खाद्य पुरविण्यात या संघटनेचा मोलाचा वाटा आहे. मानवी हक्कांच्या संदर्भात मिनार यांनी दिलेल योगदानसुध्दा तेवढच भरीव आणि कौतुकास्पद आहे. ते सध्या पीपल्स मुव्हमेन्ट फॉर ह्युमन राईट्स या चळवळीचे काम पाहात आहेत.

मिनार यांनी बनविलेल्या व राबविलेल्या, शैक्षणिक व लोकांचा समान सहभाग वृध्दिंगत करणार्‍या योजना, व उपक्रम आज जगाच्या कानाकोपर्‍यामधील दुर्लक्षित राहिलेल्या विवीध लोकवस्त्यांसाठी दिशादर्शकांचे काम उत्तमरित्या करीत आहेत. भारत व साऊथ आफ्रिका या दोन समदुःखी देशांचे गरिबी निर्मुलनाचे व क्षेत्रिय सहकार्य वाढविण्याचे प्रयत्न, व त्यादृष्टीने आखण्यात आलेले कर्यक्रम चांगल्या रीतीने सांधायला मिनार यांना पाचारण करण्यात आले होते व त्यांच्या सकस प्रयत्नांमुळे आज या दोन्ही देशांमध्ये सौहार्दपुर्ण नातं आहे. झोपडपट्टयांमध्ये हालाखीच्या परिस्थितींमध्ये रात्री काढणार्‍या बांधवांसाठी शहरीकरणासंबंधीत अनेक संशोधक व कल्पक कार्यक्रम काढण्याचे व त्यांच्या चौफेर विकासाकरिता झटण्याचे काम मिनार यांनी नेहमीच तत्परतेने केले आहे. खेड्यांच निर्दोष शहरीकरण, स्वच्छता, गृहनिर्मीती, व अनेक निरनिराळ्या समाजांच आदर्श पुनर्वसन कसं करता येईल यासंबंधीचं संशोधक आभ्यास कार्य मिनार यांनी नुकतच टीस (टाटा इन्सटीट्युट ऑफ सोशल सायन्सेस) बरोबर पुर्ण केलं. हे काम मुंबईच्या संतुलित विकासासाठी बांधिल असलेल्या एम. सी. जी. एम व वर्ल्ड बँक यांच्या मार्गदर्शनासाठी केलं. गेलं तसेच खेड्यांमधुन शहरांकडे होणार स्थलांतर थांबविण्यासाठी व लहान मुलांचे बालपण व कायदेशीर हक्क त्यांच्यापासून कोणी हिरावून घेऊ नये यासाठी मिनार व त्यांची युवा प्रयत्नशील आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*