मिलिंद सोमण

मिलिंद सोमण हा भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे. मिलिंदचा जन्म स्कॉटलंडमध्ये ४ नोव्हेंबर १९६५ रोजी झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले.

गायिका आलिशा चिनाई हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाश झोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलींद कारकीर्द कमीच यशस्वी राहिली. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.

‘टफ’ या ब्रॅंडच्या पादत्राणासाठी त्याने अनावृत्त होत मॉडेल मधू सप्रेसोबत केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली.
‘रूल्स : प्यार का सुपरहिट फॉर्म्युला’ या चित्रपटाचा तो निर्माता आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*