शिरवळकर, माधव

Madhav Shrirvalkar

 

– मुंबईटाईम्स डॉट कॉम, वात्सल्यट्रस्ट डॉट ऑर्ग, अशा विविध सोळा वेब साईटसची निर्मिती करणार्‍या “वेब डिल्स” ह्या संस्थेशी १९९७ पासून निगडित.

– “संगणक” आणि “इंटरनेट” हे अभ्यासाचे विषय मानून त्यातून “वेब डिझायनिंग : तंत्र आणि मंत्र”, “ईमेल व चॅट”, “१००१ सर्वोत्कृष्ट वेब साईटस् डिरेक्टरी” आणि “कॉम्प्युटर व्हायरस: स्वरुप आणि उपाय” ही चार पुस्तके मराठीत लिहिली. ह्या विषयांवर मराठीतील ही पहिली पुस्तके आहेत.

– “महाराष्ट्र टाईम्स” मधील “सायबर विश्व” सदरासाठी आनंद हर्षे ह्या टोपण नावाने लिखाण. त्यानंतर “लोकसत्ता” तून “संगणक जगत” हे लोकप्रिय झालेले सदर सातत्याने लिहिले.

– “मुलुंड नागरिक” हे स्थानिक पाक्षिक वृत्तपत्र गेली ११ वर्षे सातत्याने चालविले. संस्थापक, संपादक म्हणून ह्या वृत्तपत्राशी आजही निगडित.

– “नॅशनल लॅंग्वेज सर्व्हिसेस” ह्या जाहिरात एजन्सीशी सल्लागार – संचालक म्हणून गेली १८ वर्षे संबंध.

– साप्ताहिक “माणूस” मध्ये कामगार चळवळीवर लिहिलेली “लढा” ही कादंबरी आणि “सबला” ही स्त्रीबुवाबाजीवरील कादंबरी विशेष गाजली. तसेच “वधस्तंभ” ही राजकीय कांदबरी, दोन व्यावसायिक नाटके, सुमारे १२५ बालकथा, २५० हून अधिक वृत्तपत्रीय लेख ही त्यांची इतर लेखन संपदा.

– १९९७ साली “औद्योगिक स्मशानशांतता” अग्रलेखाला उत्कृष्ट अग्रलेखाचा डहाणूकर पुरस्कार …

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*