मंत्री, माधव

फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटचे मैदान गाजवणावर्‍या माधव मंत्री यांचा जन्म १९२१ साली नाशिकमध्ये झाला होता. अत्यंत कडक शिस्तीचे क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे माधव मंत्री यांनी १९४१ रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शालेय जीवनातच त्यांना क्रिकेटची गोडी लागली. तर १९५१ मधील इंग्लंड दौकर्‍यात त्यांना भारतीय संघात जागा पटकावली होती. या कसोटीत इंग्लंडच्या तेजतर्रार मार्‍यासमोर मंत्री यांनी ३५ धावा करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मंत्री हे ४ कसोटी सामने खेळले होते. पण रणजी यांची कामगिरी लक्षणीय असल्यामुळे सामन्यांमध्ये मंत्री यांनी ९५ सामन्यांमध्ये ४,४०३ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ शतक आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. १९४८-४९ मध्ये महाराष्ट्राच्या संघाविरुद्ध मुंबईकडून खेळताना रणजीच्या फायनलमध्ये त्यांनी २०० धावा करत क्रिकेट प्रेमींची मन जिंकून घेतली. या सामन्यात तब्बल नऊ शतके लागली होती. मात्र माधव मंत्री एकटेच द्विशतकापर्यंत पोहोचू शकले होते. या सामन्यात दोन्ही संघाच्या मिळून २३७६ धावा झाल्या होत्या, जो आजही रणजी क्रिकेटमधला विक्रम आहे. मुंबईला विजय मिळाला होता. या सामन्यात तसंच मंत्री यांनी रणजी मुंबई संघांचे नेतृत्वही केले होते.

१९६८ मध्ये मंत्री यांनी क्रिकेट मधून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मंत्री यांनी दादर युनियनच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणून काम केले व या माध्यमातून अनेक होतकरु क्रिकेटर या देशाला दिले. माधव मंत्री राष्ट्रीय निवड समितीचे सदस्यही होते. १९९० मध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून ते इंग्लंड दौर्‍यावरही गेले होते. १९८० च्या दशकामध्ये माधव मंत्री मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवडून आले. “एमसीए” चे अध्यक्षपद भूषवणारे मंत्री हे शेवटचे क्रिकेटपटू होते.

२३ मे २०१४ या दिवशी ह्रदयाच्या तीव्र झटक्याने माधव मंत्री यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ९३ वर्षांचे होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*